सुजाता आ. लेले
त्या गुलाबी थंडीत गुलाबी फुलांच्या साकुराची असंख्य झाडं दिमाखदारपणे डोलत होती. खासगी वाहन नव्हतं, नाहीतर उतरून भराभरा फोटो काढले असते. अल्पाईनचा मार्ग जवळ येऊ लागला तशी बर्फाच्छादित शिखरं दिसू लागली. खाली उतरल्यावर खूपच थंड हवा होती. तिथं आम्ही इलेक्ट्रिक बस, केबल कार, ट्रॉली बस अशा वेगवेगळ्या वाहनांमधून प्रवास केला.
दोन विमानांचा दमवणारा प्रवास करून आमचा ग्रुप जपानमधल्या ओसाकाच्या कानसाई इंटरनॅशनल विमानतळावर पोहोचला. तिथून हारूका एक्स्प्रेसनं हॉटेलवर जाणार होतो. हारूका नाव वाचल्यावर नवल वाटलं. ‘जिंकूका’ अशा नावाचीही एक्स्प्रेस असेल का, अशा नर्म विनोदानं हसू आलं आणि प्रवासाचा शीण गेला.