कॅप्टन निलेश गायकवाड
प्रवासाला जाताना त्याचे नियोजन योग्य पद्धतीने केले पाहिजे. त्यामुळे प्रवास सुखकर व सुरक्षित होतो. आयत्या वेळी होणारी गडबड टाळता येते. हे नियोजन कसे करावे, यासाठी काही मार्गदर्शक टिप्स...
वेगवेगळ्या देशांत फिरणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र प्रवासाबद्दल अजूनही काहींच्या मनात काहीशी भीती असते. मित्रपरिवार, सहकारी यांच्याकडून ऐकलेल्या काही अनुभवांमुळे काही वेळा प्रवासाची धास्ती वाटू शकते. पण बऱ्याचदा या घटना घडण्याला कारण असते, ते म्हणजे योग्य नियोजनाचा आणि योग्य माहितीचा अभाव. आपला प्रवास नियोजित, आरामदायी व सुरक्षित कसा होईल याकडे आपण लक्ष दिले पाहिजे.
कुठलाही विमानप्रवास त्या विमानाचा दर्जा, विमान कंपनीचे नियम व अन्य काही गोष्टींवर अवलंबून असतो. त्यामुळे या दोन्हीविषयी व्यवस्थित माहिती घेणे आवश्यक असते.