गणपती विशेष : ।। तू सुखकर्ता ।।

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नवे पुस्तक वाचकांच्या भेटीला आलं आहे.
गणपती विशेष : ।। तू सुखकर्ता ।।
Updated on

संपादन : बबनराव किसनराव पाटील

।। तू सुखकर्ता ।। हा ग्रंथ म्हणजे गणेश उपासक, अभ्यासक, कलाकार, साहित्यिक, इतिहासतज्ज्ञ, संस्कृतपंडित, पुरातत्त्ववेत्ते, चित्रकर्ते यांनी वाचकांसमोर ठेवलेली श्रीगणेशाची विविध रूपेच ...

विश्वाचा मुळारंभ श्रीगणेश! हे एकच असणारे ब्रह्मतत्त्व मायामय झाले आणि अनेकत्वात प्रकटले. निर्गुण; निराकार तत्त्वाने आकार घेतला, ते सगुण साकार झाले. ह्याच तत्त्वाने विश्व निर्मिले, ते ब्रह्माच्या रूपात प्रकटले. विश्वाचे संचालन केले आणि विष्णूच्या रूपात नटले. शेवटी समस्त कार्याचा नाश करणारे महाकालरूपही ह्याचेच. ह्याच्याच तेजाने त्रिभुवन प्रकाशाने झगमगले, हे सूर्यरूपात उदयास आले. ह्याच तत्त्वाच्या मोहिनीने आदिशक्तीस धारण केले. ब्रह्मा-विष्णू-महेश-सूर्य आणि शक्ती या पंचेश्वरांच्या समस्त क्रीडा म्हणजे याच आदिबीजाच्या लीला. आपल्या ह्या विश्वपित्याचे दर्शन घेण्यासाठी पंचेश्वरांनी मनोभावे प्रार्थना केली आणि श्रीगणराज प्रभू प्रकट झाले. ह्या पंचदेवतांनी भाद्रपद शुक्ल चतुर्थीस विश्वातील सर्वप्रथम अशा श्रीगणेशमूर्तीची विधिपूर्वक प्राणप्रतिष्ठा श्रीक्षेत्र मयुरेश्वर येथे केली. ह्या मयुरेश्वराच्या कृपेनेच तू सुखकर्ताच्या निर्मितीची कल्पना सुचली, आणि ती प्रत्यक्षात साकारही झाली. ‘वास्तुरहस्य’ प्रकाशनाचे हे ग्रंथरूप नांदीपुष्प मोरयाचरणी अर्पण करताना, नमनाचे पहिले लेखसुमन तू सुखकर्ता अर्थातच श्री मयुरेश्वर!

गणपती विशेष : ।। तू सुखकर्ता ।।
Special Parliament Session: नव्या भवनात जात आहोत पण जुनं संसद भवन...; PM मोदींनी व्यक्त केला विश्वास

मूळचा वारकरी संप्रदायाचा असल्याने लहानपणापासूनच माझ्यामध्ये नकळत धार्मिकता रुजली. गणपती हे आमच्या घरचं लाडकं दैवत. स्वाभाविकच या देवतेविषयी माझ्या मनातील आकर्षण आणि श्रद्धाभाव लहानपणापासूनच अधिकाधिक वाढत गेला. वास्तुशास्त्रावर नियमित लिखाण चालू असतानाच दहा वर्षं दिवाळी अंकांचे संपादन केल्याने साहित्यनिर्मितीचाही अनुभव होताच. श्री गणेश उपासनेवरील एक पुस्तक करताना गणेशग्रंथांंच्या वाचनाबरोबरच उपासनाही सुरू झाली. अनेक थोर गणेश उपासक आणि अभ्यासक यांचा सहवास घडू लागला. याच काळात कॉफी टेबल पद्धतीचे काही सुंदर ग्रंथ माझ्या पाहण्यात आले आणि आपणही अशी ग्रंथनिर्मिती करावी असे मनात आले. अर्थातच ग्रंथविषय ठरवताना १४ विद्या आणि ६४ कलांचा अधिपती असणाऱ्या श्रीगणेशाचेच स्मरण प्रथम झाले.

गणपती विशेष : ।। तू सुखकर्ता ।।
Special Parliament Session: सीपीआयच्या खासदारानं व्यक्त केली शंका; म्हणाले, संसदेचं अधिवेशन सुरु झालं पण...

माझ्या या संकल्पनेविषयी मुंबई विद्यापीठ-संस्कृत विभागाच्या प्राध्यापिका डॉ. आसावरी बापट आणि डॉ. सुनीता पाटील यांना सांगितले. दोघींनाही ही संकल्पना खूपच भावली. आणि माझ्या बरोबरीने त्याही या कामात सहभागी झाल्या. पुण्याचे आशुतोष बापटही आम्हाला जोडले गेले. सर्वानुमते ग्रंथाचे तू सुखकर्ता हे नाव निश्चित झाले.

श्रीगणेशाविषयक सर्व समावेशक आणि सर्वस्पर्शी लिखाण असणारी विषयसूची निश्चित झाली. गणेश उपासक, अभ्यासक, कलाकार, साहित्यिक, इतिहासतज्ज्ञ, संस्कृतपंडित, पुरातत्त्ववेत्ते ह्या सार्‍यांशी संपर्क साधणे सुरू झाले.

निर्माणाची साथ देणारे गजमुख आणि सगुणाचे द्योतक मानवी देहरूप असे श्रीगणेशाचे प्रसन्न नरकुंजररूप! गाणपत्य संप्रदायाचे, विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड यांनी श्रीगणराजाचे परब्रह्म, परमात्मा, ॐकाररूप विविधांगांनी अधोरेखित केले आहे.

गणपती विशेष : ।। तू सुखकर्ता ।।
ST Ticket Booking : प्रवाशांना गर्दीपासून दिलासा! एसटीचे तिकीट बुकिंग होणार ‘आयआरसीटी’वर

श्रीगणेश स्तोत्रसाहित्यात आद्य शंकराचार्यांच्या तीन स्तोत्रांचे स्थान अनन्यसाधारण आहे. गणेशाचे एकश्लोकी स्तवन (गलद् दान गण्डं मिलद् भृङ्गखण्डं...), महागणेश पंचरत्नस्तोत्र (मुदाकरान्तमोदकं सदा विमुक्ति साधकं...), गणेशभुजंगस्तोत्र (रणत्क्षुद्रघण्टानिनादाभिरामं...). तत्त्वज्ञान आणि काव्य, सगुण आणि निर्गुण, प्रापंचिक आणि पारमार्थिक अशा अनेक तत्त्वांचा सुंदर संगम असणाऱ्या ह्या स्तोत्रांचा ‘जगद्‌गुरू शंकराचार्यांच्या सगुण-निर्गुण गणेश’ या लेखात साकल्याने विचार केला आहे. या तीन स्तोत्रांची अतिशय नादमधुर, गेय अशी मराठी समश्लोकी सादर केली आहे, अरुंधती दीक्षित यांनी.

गणपती विशेष : ।। तू सुखकर्ता ।।
Rohit Sharma on Ashwin: 'एक अष्टपैलू म्हणून अश्विन...' अक्षर पटेलची दूखापत अन् कर्णधार रोहित शर्माने दिले संकेत

एखाद्या देवतेची सहस्रनामावली आहे, म्हणजे ती प्रधान देवता असते. श्रीगणेशांचेही सहस्रनामस्तोत्र आहे. आध्यात्मिक ग्रंथांत भगवद्‌गीतेप्रमाणेच गणेशगीतेलाही श्रेष्ठ स्थान आहे. गणेशपुराणातील क्रीडाखंडात राजा वरेण्याला आयुष्य आनंदाने जगण्यासाठी गणेशाने केलेला उपदेश असे श्रीगणेशगीतेचे स्वरूप असून भगवद्‌गीतेप्रमाणेच गणेशगीतेतही प्रश्नकर्ता शिष्य क्षत्रिय आहे तर उत्तर देणारी अधिकारी व्यक्ती ब्रह्मस्वरूप आहे. भगवद्‌गीतेचे गुरू-शिष्य संवाद हे रूप गणेशगीतेतही कायम आहे.

अथर्ववेदात गणपतीचे सकल वर्णन करणारे गणपत्यथर्वशीर्ष नावाचे उपनिषद आहे. श्रीगणेशाची इतरही स्तोत्रे म्हणजे, श्रीगणेशन्यास स्तोत्र, श्रीगणेश हृदय, श्रीगणेशकवच, श्रीगणेश महिम्नस्तोत्र, योगशान्तिप्रद गणेशस्तोत्र, शत्रुसंहारक एकदंतस्तोत्र. या सर्व स्तोत्रांवर अभ्यासपूर्ण भाष्य करणारे स्वतंत्र लेख आपण या ग्रंथात वाचू शकतो.

गणपती विशेष : ।। तू सुखकर्ता ।।
Ekda Yeun Tar Bagha: मराठमोळ्या कॉमेडीचा तडका, प्रसाद खांडेकरच्या 'एकदा येऊन तर बघा' सिनेमाची घोषणा

संत वाङ्‌मयाचे ज्येष्ठ अभ्यासक ल. रा. पांगारकर म्हणतात, “मराठी भाषेतील आरत्या हे शक्तिरसप्रधान काव्य मंदिरातील एक स्वतंत्र असे देवघर आहे. देव आणि भक्त यांच्यामधील पूज्य- पूजक संबंधाचे साक्षात दर्शन घडविणारे आरसे म्हणजेच आरत्या होत.” नित्याच्या गणेशआरत्यांप्रमाणेच, मुक्तेश्वर पंडित रामात्मज, दास विठ्ठल नारायणसुत, सहजनामा, हनुमंत कवी, यादवसुत, विष्णुदास, दास विनायक ह्यांच्या भक्तिमय रचनांचा मागोवाही ग्रंथात आहे.

महाराष्ट्र ही संतांची भूमी. सर्वच संतांनी गणेशास आळवले आहे, नमन केले आहे. त्यांच्याही रचना आणि त्यांवर भाष्य करणारे लेखन ग्रंथांत असून गणेश पाळणा, गणेश काकडाही आहे.

गणपती विशेष : ।। तू सुखकर्ता ।।
Special Parliament Session: मोदींनी नेहरूंपासून मनमोहन सिंग यांच्यापर्यंत सर्वांचा केला उल्लेख! म्हणाले...

ग्रंथलेखनाची सुरुवात ‘श्री’पासून करण्याची प्रथा आहे. हा ‘श्री’ म्हणते ॐकाराच्या ‘अ’, ‘उ’, ‘म’मधील वर्णांचा श्वास आहे. ‘अ’ म्हणजे अभ्यास, ‘उ’ म्हणजे उच्चार, ‘म’ म्हणजे मनन. सृष्टीच्या मुळारंभाचा पहिला श्वास ‘श्री’त आहे. ‘अमूर्त परब्रह्म’ आणि ‘इंद्रियगोचर’ यांचा समन्वय म्हणजे ‘श्री’. ज्येष्ठ साहित्यिक आणि संतसाहित्याचे गाढे अभ्यास डॉ. यशवंत पाठक यांच्या लेखणीतून साकारलेला ‘श्रीकार गणेश’ हा लेख म्हणजे भक्त, अभ्यासक व साहित्यप्रेमींसाठी आनंदानुभव आहे.

कार्यारंभी पूजन आणि पंचायतनात लाभलेले स्थान यामुळे गणेशास महत्त्वाची देवता मानली जाते. गाणपत्य संप्रदायातील आचरणाचे नियम (गाणेश धर्म), नित्य आचरणात आणावयाची पाच अंगे (गणेश पंचांग), आचमन ते विसर्जन अशी केवळ गणेशमंत्रांनीच युक्त गणेशपूजा (गाणेशी आचमन), गाणपत्य नमस्कार पद्धती यावर विद्यावाचस्पती स्वानंद पुंड यांचे विस्तृत भाष्य आहे. याशिवाय गणेश मानसपूजा, पार्थिव गणेश उपासना, प्रत्येक महिन्यागणिक येणारी असंख्य गाणपत्य व्रते, गणेशप्रिय दूर्वा, औषधी-पत्रीपूजा, गणेशांचे नैवेद्य आणि गणेश तत्त्वज्ञान यावरील प्रा. पुंड ह्यांचे भाष्य म्हणजे गणेशभक्तांसाठी पर्वणीच आहे. यांद्वारे गणेश उपासकांमधील अज्ञान, संभ्रम, गैरसमजुती दूर होण्यास खचितच मदत होईल.

गणपती विशेष : ।। तू सुखकर्ता ।।
Special Parliament Session: नव्या भवनात जात आहोत पण जुनं संसद भवन...; PM मोदींनी व्यक्त केला विश्वास

श्रीगणेशांना वाहिलेली दोन मुख्य पुराणे म्हणजे श्रीमुद्गल पुराण आणि श्रीगणेशपुराण तसेच गाणपत्य संप्रदायाचा आधारस्तंभ म्हणजे संप्रदायाची थोर आचार्य परंपरा (गणकाचार्य-मुद्गलाचार्य-भृशुण्डी महाराज, गिरीजासूत् योगीन्द्र, श्रीगणेश योगीन्द्राचार्य, श्री अंकुशधारी महाराज, श्री हेरम्बराज महाराज, श्री गजानन महाराज पुंडशास्त्री) या विषयीचे लेखनही विद्यावाचस्पतींनी ग्रंथात केले आहे.

विद्या आणि कलेची देवता असल्याने श्रीगणेश कलाकारांचाही लाडका आहे. चित्रकार वासुदेव कामत यांचा ‘दोन हातांचा गणपती’ त्यांच्या लेखासह, शिल्पकार भगवान रामपुरे यांची गणेशशिल्पे त्यांच्या मुलाखतीसह, सुलेखनकार अच्युत पालव यांचे श्रीगणेशाविषयक सुलेखन (अक्षरगणेश), रूपाली देसाई यांची नृत्यकलेतील श्रीगणेश (२१ गात्रांच्या गणेशताल व गणेशपुराणांसह), पेणच्या मूर्ती आणि मूर्तिकारांची खासियत व इतिहास (गणेशमूर्तीची पंढरी - पेण) हे सारेच ग्रंथात अंतर्भूत आहे. तू सुखकर्ताची भव्य शब्दसृष्टी चित्रमय आणि उदात्त करण्याची जादू केली आहे, यामधील चित्रकारांनी.

गणपती विशेष : ।। तू सुखकर्ता ।।
Ekdant Ganesh Story In Marathi : श्री गणेशाचा दात कोणी तोडला? बाप्पाच्या एकदंत नावामागील जाणून घ्या रहस्यकथा

ही भान हरपून टाकणारी चित्रे साकारली आहेत वासुदेव कामत, सुहास बहुळकर, मिलिंद फडके, आनंद सोनार, रूपेश मेस्त्री, प्रकाश लहाने, अरूण दाभोळकर, धनंजय सास्तकर, दिलीप कदम, विनायक पोतदार, रामचंद्र खरटमल, राहुल देशपांडे, हर्षवर्धन कदम, सचिन कोल्हटकर, सचिन जोशी, कुणाल गोरणकर, सदाशिव सावंत अशा ख्यातकीर्त चित्रकारांनी. सर्वव्यापक अशा गणेशांची तीर्थे सर्वदूर पसरली आहेत. सर्वज्ञात अष्टविनायक, विदर्भातील अष्टविनायक, गडकिल्ल्यांवरील श्रीगणेश, आडवाटेवरचे गणपती, दरवाजाच्या चौकटीवर गणेशपट्टीवरील श्रीगणेश इतकेच काय पण जंगलातील काष्ठाकारातही श्रीगणेशाचे दर्शन भक्त घेतात.

गणपती विशेष : ।। तू सुखकर्ता ।।
Foxconn: फॉक्सकॉन कंपनीने PM मोदींना वाढदिवसाचे दिले खास गिफ्ट, भारतात होणार....

दैवत परंपरेतील आधुनिक काळातील सर्वाधिक लोकप्रिय देवता म्हणजे श्रीगणेश. असे असले तरी उपास्य दैवत म्हणून गणपती दीर्घकालानंतर लोकप्रिय झाल्याचे कळते. अभ्यासकांच्या मते श्रीगणेशाचा प्रवास ‘विघ्नकर्ता’ ते ‘विघ्नहर्ता’, ‘दुःखकारक’ ते ‘दुखहारक’ असा झाला आहे, जो अचंबित करणारा आहे. विनायकाच्या विघ्नकर्तेपणाची जाणीव करून देणारी व्रातपती, शालकंटक, देवयजन, उस्मित अशी नावे प्राचीन साहित्यात आढळतात. कुशाण काळात (इ.स १ले ते ३रे शतक) या चार विनायकांच्या एकीकरणातून एक किंवा गणपती बनला. इण्डोग्रीक राजांनी हत्तीला मानाचे स्थान दिले व हत्तीकृपेने ह्या भावनेतून गजमुख आणि मनुष्यदेहधारी अशी यक्षप्रतिमा (गजयक्ष) विकास पावली. ठेंगणा बांधा, विशाल उदर, तुंदिलतनु अशा राजयक्ष किंवा गजाननाच्या मूर्ती कुशाण काळात होत्या. गणेशाच्या पूजनाचा हा मनोज्ञ प्रवास मांडला आहे, इतिहासतज्ज्ञ डॉ. एम. के. ढवळीकरांनी. श्रीगणेश ही देवता भारताबाहेरही प्रसिद्ध होती, याची साक्ष देणाऱ्या गणेशमूर्ती वेगवेगळ्या काळात, वेगवेगळ्या आशियायी देशांत आढळत. त्यांचे हुबेहुब वर्णन केले आहे माजी कुलपती आणि मूर्तिशास्त्राचे तज्ज्ञ डॉ. गो.बं. देगलूरकर सरांनी.

गणपती विशेष : ।। तू सुखकर्ता ।।
Narendra Modi : 'मोदीजी थोडी सुट्टी घ्या, मजा करा'! किंग खान जे बोलला त्यावरुन आता...., वेगळ्याच चर्चेला सुरुवात

गणेश देवतेच्या नियम संदर्भात अनेक मते असली तरी ती चिकित्सकांसाठी. श्रद्धा, निष्ठा, आध्यात्मिकता जपणारे भारतीय गणेशभक्त मात्र गणेशस्तुतीत रममाण झाले आहेत. गणेश देवता आज भारताबाहेरही पूजली जात आहे, ती मात्र, पूर्णपणे भारतीय देवता म्हणून.

ग्रंथाच्या प्रस्तावनेसाठी अध्यात्म क्षेत्रातील अधिकारी व्यक्ती, उपासकांची नावे नजरेसमोर असतानाही विज्ञान आणि अध्यात्म यांची सांगड घालणारी, थोर वैज्ञानिक आणि गणेशभक्त असणाऱ्या डॉ. रघुनाथ माशेलकर यांची प्रस्तावना म्हणजे तू सुखकर्ताच्या शिरपेचातील मानाचा तुरा! या ग्रंथाकरिता भारतभर अनेकानेक प्रवास घडले, शृंगेरी, द्वारका, कांचीकामकोटी, करवीर येथील पीठाधीश्वर, श्री श्री रविशंकर, फुलगावचे स्वामी स्वरूपानंद या गुरुश्रेष्ठांनी उपक्रम जाणून घेऊन, त्यास आपले आशीर्वचन प्रदान केले. (लिखित स्वरूपात). मोक्षगुरू परमपूज्य श्री यति नारायणानंद सरस्वती यांचा प्रभावी मंत्र “मंगलमूर्ते विघ्नहरा। दुरितनाशना कृपा करा।।” हा श्री. जगद्‌गुरु शंकराचार्य, करवीर पीठ यांनी दिला असून हा मंत्र कांचीपुरमच्या परमाचार्यांनी सिद्ध केला आहे.

गणपती विशेष : ।। तू सुखकर्ता ।।
Video : कारमध्ये बसले होते माजी पंतप्रधान, ड्रायव्हर काच उघडून महिलेच्या तोंडावर थुंकला; व्हिडीओ पाहा

अशा भव्य ग्रंथनिर्मितीचा खर्चही डोंगराएवढा होता. या खर्चाबाबत श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे तत्कालीन विश्वस्त नितीन विष्णू कदम यांच्यासोबत चर्चा झाली. नितीनजींच्या परिचयाने एम.इ.पी.चे सर्वेसर्वा जयंतराव म्हैसकर यांच्याशी गाठभेट घडून आली. ग्रंथाची पूर्ण रूपरेषा समोर मांडताच त्यांनी ग्रंथाच्या खर्चाची जबाबदारी उचलली आणि डोक्यावरील फार मोठे ओझे हलके झाले. ग्रंथाच्या निमित्ताने जवळजवळ सगळ्यांशीच कायमचा स्नेह-बंध जुळला, हीसुद्धा गणरायाचीच कृपा! म्हणूनच तू सुखकर्ता हाती देताना कृतकृत्यतेचे समाधान आहेच, पण या समाधानाला कृतज्ञतेच्या भावनेची किनार आहे.

गणपती विशेष : ।। तू सुखकर्ता ।।
Pakistan Fuel : तस्करीमार्फत आलेल्या स्वस्त इंधनाकडे पाकिस्तानच्या नागरिकांचा ओढा; ५०० पंपांवर कारवाई

ग्रंथारंभी निर्गुण निराकार असणारे गणेशतत्त्व ग्रंथाची पाने उलगडताना क्रमाक्रमाने सर्वव्यापक, सर्वस्पर्शी, आणि सर्वसमावेशक रूपात साकारत जाते आणि ह्या साजिऱ्या रूपाच्या उत्सवरूपी बहराने ग्रंथसिद्धी होते. ईश्वरी इच्छेनेच तू सुखकर्ताची निर्मिती झाली, असे मला अंतःकरणापासून वाटते. या चित्रमय शब्दसृष्टीचा आनंद घेताना मोरयाच्या अतिदिव्य वैभवाची ओझरती कल्पना जरी वाचकांना आली, तरी तू सुखकर्ताच्या निर्मितीचे प्रयोजन सफल झाल्याचे समाधान लाभेल.

पुस्तक : ।। तू सुखकर्ता ।।

संपादन : बबनराव किसनराव पाटील

प्रकाशन : वास्तुरहस्य प्रकाशन, मुंबई

किंमत : ₹ २१००

पाने : ३३०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.