मंगेश साखरदांडे
ट्रीटमेंट. दोन आठवडे माहितीच्या महा(माया)जालापासून दूर राहा. माहितीच्या महाजालातून मिळणारी माहिती हे अंतिम सत्य असतंच असं नाही, हे समजावून घ्या. मिळालेली प्रत्येक माहिती विश्वासातल्या व्यक्तींकडून, वैद्यकीय बाबतीत डॉक्टरांकडून, तपासून घ्या. काही लक्षणं दिसत, वाटत असतील तर डॉक्टरांना दाखवा, कन्सल्ट करा. औषधंही डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्या. आणि अनावश्यक काळजी करत राहू नका.’
आणि एक फूटनोटही होती. ‘बुवा, यावर सेकंड ओपिनियन घ्यायला माझी हरकत नाही, पण त्यासाठीही एखाद्या तज्ज्ञ डॉक्टरांनाच भेट, माहितीचं महा(माया)जाल नको.’