डॉ. नंदकुमार कामत
‘वारूळ’ हेच गोव्यातील पहिले नैसर्गिक मंदिर मानावे लागेल. कालौघात प्राकाराबाहेर असलेली वारूळे मंदिरांच्या रचनेत सामावण्यात आली. बदामी चालुक्य काळात मूर्ती-शिल्पनिर्मितीचे ज्ञान गोव्यातील शिल्पकारांनी आत्मसात केले. त्यामुळे सातव्या-आठव्या शतकापासून एक नवीन स्थापत्य परंपरा सुरू झाल्याचे दिसते.