डॉ. मंदार दातार
भवताल बेचिराख करून टाकणाऱ्या वणव्यांनंतर बऱ्याच वनस्पती पावसाच्या पहिल्या सरींची वाट बघत निद्रितावस्थेत जातात आणि थेट पुढच्याच वर्षी फुलतात. मात्र ‘डिक्लीप्टेरा’ला अशा आगीच्या प्रकोपानंतर काहीच दिवसात एप्रिल-मेच्या दरम्यान या जाडजूड मुळांमधून परत नवीन धुमारे आलेले होते.