सुरेश वांदिले..कोणत्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला तर शंभर टक्के करिअर घडेल? करिअर संदर्भात हा प्रश्न सर्वाधिक विचारला जातो. या प्रश्नाचा ‘इंडेक्स’ दशकानुदशके बदललेला नाही. तो कायम टॉपवरच. पुढेही कित्येक दशके हा प्रश्न टॉपवरच असणार, हे निश्चित!.गेल्याच महिन्यात मुंबई आयआयटीच्या प्लेसमेंटविषयी एका बातमीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. मुंबई आयआयटीत प्रवेश मिळाला म्हणजे ‘नवकोट नारायण’ होण्याची लॉटरीच लागते अशी आपली समजूत होती, आहे आणि भविष्यातही राहील. या वाटण्यास तसा काही सॉलिड आधारबिधार नव्हता, पुढेही नसेल. कारण प्लेसमेंटमध्ये १० ते १५ किंवा फार तर २० प्रज्ञावंत मुलांना कोटींचं पॅकेज मिळतं, त्यांचाच केवळ गवगवा होतो. पण मुंबई आयआयटीत प्रवेश मिळालेल्या इतर १,३६५ मुलाचं काय? त्यांच्या पॅकेजची चर्चा काही होत नाही. यंदा तर कहरच झाला. प्लेसमेंटचं सेशन संपत आलं, तरी ३५-३६ टक्के विद्यार्थ्यांना एकाही कंपनीनं नियुक्ती पत्र दिलं नव्हतं. .आणखी कोणत्या तरी एका आयआयटीमधील परिस्थिती याहीपेक्षा चिंता करण्यासारखी. तिथं तर काही पॅकेजेस चार-पाच लाखांपासून सुरू झाल्याचं अधिकृतपणे सांगण्यात आलं. म्हणजेच आयआयटीही ‘हमखास उत्तम नोकरी’ची गॅरंटी देऊ शकत नाही.याचा अर्थ आयआयटीच्या खडतर मार्गानं जायचं नाही, असा नाही. आयआयटीमध्ये सर्वाधिक उत्कृष्ट शिक्षण मिळतं, यावरही दुमत होण्याचं कारण नाही. मात्र उत्तम आणि उत्कृष्ट करिअरची हमी मिळेलच याची यापुढे खात्री नाही.तसं तर ते इतर संस्था आणि या संस्थांमधील अभ्यासक्रमांबद्दलही म्हणता येतं. त्यामुळेच ‘कोणता अभ्यासक्रम १०० टक्के उत्तम करिअर घडवू शकेल?’ या प्रश्नाची लोकप्रियता कधीच कमी होणारी नाही..हे जरी खरं असलं, तरी आयआयटीमधील ज्या विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळाली नाही किंवा अपेक्षेप्रमाणे कमी पॅकेज मिळालं, त्याची काहीएक कारणं असतीलच ना! तीसुद्धा समोर यायला हवीत. उगाच संस्था आणि अभ्यासक्रमांच्या उपयुक्ततेबाबत सरधोपट मत व्यक्त करणं ही कृती, आयआयटी व इतर दर्जेदार शिक्षण संस्थांच्या अभ्यासक्रमाबाबत अन्यायकारक ठरते..त्यामुळेच कोणते अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर १०० टक्के करिअर घडू शकतं, याचा विचार न करता कोणते अभ्यासक्रम केल्यास करिअरच्या संधी उपलब्ध होऊ शकतात, याचा विचार करायला हवा. शिवाय हे अभ्यासक्रम कितीही उत्तम असले तरी विद्यार्थ्यांनी हे अभ्यासक्रम मन लावून, अभ्यासक्रमाचा जो काही कालावधी असेल त्या काळात झोकून देऊन आणि सर्व संकल्पना समजूनउमजून अभ्यास करणं गरजेचं असतं. चौफेर ज्ञानप्राप्ती, विविध कौशल्यांचा अंगीकार, मिळवलेल्या कौशल्याला आणखी धार देणं म्हणजे अपस्किलिंग आणि नवी कौशल्य हस्तगत करणं म्हणजे रिस्किलिंग आवश्यक ठरतं. या घटकांवर जे विद्यार्थी लक्ष केंद्रित करतील, त्यांना अशा अभ्यासक्रमातून नक्कीच सुयोग्य मार्ग आणि निश्चित दिशा मिळू शकते. स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा आत्मविश्वासही मिळू शकतो. पॅकेजपेक्षा असा आत्मविश्वास महत्त्वाचा! तो असेल तर मनासारखं पॅकेज काय, ते आज ना उद्या मिळेलच. ‘तो आज’ किंवा ‘तो उद्या’ उगवण्यासाठी संयम ठेवून अथक परिश्रमाची कास धरावी लागेल.(सुरेश वांदिले करिअर समुपदेशक आणि निवृत्त शासकीय अधिकारी आहेत.)--------------------------------------.Career In Art : फक्त कलासक्तच नव्हे तर कलाजीवीदेखील.! कलेच्या क्षेत्रातही भरभक्कम करियर करणाऱ्याची संख्या वाढतेय .सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.