प्रबोधनाचे ‘उत्तर’पर्व
‘वैष्णव जन तो तेने कहिये’ हे नरसींचे भजन साबरमतीपासून ते सेवाग्रामपर्यंत गांधी आश्रमांत गायले जाऊ लागले. एकाप्रकारे गांधीवादाचे सार म्हणून ह्या भजनाचा स्वीकार गांधीवादी विचारधारेने केला. गांधींजीमुळे हे नाव आंतरराष्ट्रीय पटलावर गेले. भारतातील चातुर्वर्ण्य व्यवस्थेच्या सर्वात खालच्या पायरीवर उभ्या असलेल्या प्रचंड मोठ्या जनसमुदायाचे हरीचे जन म्हणजे ‘हरिजन’ असे गांधींजीनी केलेले नामकरण ही या संतांची देणगी आहे.