पाण्याला रंग नसतो, हे सर्वार्थाने खरे आहे. पाणी कोणत्याही सीमा, बंधने, विचार, वर्ग यापलीकडे आहे; तसे राहायला हवे. तो जगाचा समाईक साधनस्रोत असायला हवा. आपले वर्तमान आणि भविष्यातील पिढ्यांसाठी हे जग अधिक शांततामय, समृद्ध करण्याचे सामर्थ्य पाण्यामध्ये आहे.
सर्वांचा सहयोग, नावीन्यपूर्ण उपायांचा अंगीकार आणि सर्वसमावेशक शासनविचार यांतून आपण पाणीटंचाई आणि पाण्यासाठीचा संघर्ष यांना सकारात्मक वळण देऊ शकतो. सर्वांसाठी उज्ज्वल, जल-सुरक्षित भविष्याचा मार्ग खुला करू शकतो.