केतकी जोशी
‘नाही’ शब्द ऐकल्यावर नेमके आपल्या मनावर काय परिणाम होतात, याबद्दल मनोविश्लेषकांनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत. जेव्हा आपण ‘नाही’ असं ऐकतो, तेव्हा आपल्या मनात त्या घटनेशी, प्रसंगाशी संबंधित एखादी जुनी आठवण झपकन जागी होते, कुणीतरी आपल्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहे का, असा विचार येतो आणि त्यामुळेच आपल्याला रागही येतो.