Solar storm : सौर वादळ म्हणजे काय? यामुळे पृथ्वीवरील विद्युत पुरवठ्यात खंड पडून विजेची उपकरणे बिघडू शकतात?
सूर्यावरचे डाग ही एक अतिशय विलक्षण आणि अचंबित करणारी अशी खगोलीय घटना आहे. अकरा वर्षांच्या चक्रात पृथ्वीवर या डागांचे परिणाम होत असतात. मात्र दर अकरा वर्षांनी या डागांची संख्या कमी-जास्त का होते, हे अजूनही न उलगडलेले कोडे
सौर वादळांमुळे पृथ्वीवरील विद्युत पुरवठ्यात खंड पडून विजेची उपकरणे बिघडू शकतात, रेडिओचे; टीव्हीचे प्रक्षेपण बंद पडू शकते. एवढेच नव्हे तर मानवी विचारप्रक्रियेवरही याचा परिणाम होऊ शकतो, असेही काही अभ्यासकांचे म्हणणे आहे.