अनेक आजारांचे मूळ हे आहारात असते. चुकीच्या आहारामुळे होणारा आजार, तो बरा व्हावा यासाठी औषधे, औषधांचे दुष्परिणाम होऊ नयेत यासाठी आणखी औषधे, वाढलेली औषधे कमी करण्यासाठी अजून औषधे अशा दुष्टचक्रात आज आपण अडकलो आहोत. यातून अखेरपर्यंत सुटका होत नाही. हे थांबविण्यासाठी आहाराविषयी जनजागृती होणं आवश्यक आहे. आहार म्हणजे काय, काय खावं, काय नको इथपासून ते अगदी अन्नघटक, त्यातली पोषणमूल्यं अशी विविधांगी माहिती आपल्याला असणे आज अत्यावश्यक झाले आहे.