Fear : भय इथले संपत नाही.!

कवी ग्रेस जेव्हा ‘भय इथले संपत नाही...’ असं म्हणतात, तेव्हा ते कोणत्या भयाबद्दल व्यक्त होत असावेत? नेमकं कोणतं भय त्यांना अभिप्रेत आहे? भीती कशाचीही वाटू शकते याची प्रचिती तर अनेकजण देतात
Fear -  anxiety
Fear - anxiety esakal
Updated on

डॉ. बाळ फोंडके, मुंबई

काहीजणांना चिंता आणि भीती समानार्थी वाटतात. चिंता किंवा काळजी वाटणं म्हणजेच भीती, असं समीकरण करतात. पण या दोन भिन्न भावना आहेत यावर आता वैज्ञानिकांचं एकमत झालं आहे. याचा अर्थ त्यांचा एकमेकींशी संबंधच नाही, असा होत नाही. काही बाबतीत या दोन भावनांच्या आविष्कारापोटी जो ताण जाणवतो, तो समानच असतो. पण त्या तणावावर आपली नेमकी कशी प्रतिक्रिया उमटते यात मात्र फरक असतो.

ॲशली क्रॅन या कॅनडातील आघाडीच्या विज्ञानलेखिका. त्यांनी स्वतःचा एक विचित्र अनुभव सांगितला आहे. ‘‘मी बाहेर पडायच्या तयारीत होते. थोडासा उशीरच झाला होता. पण तेवढ्यात मी माझा फोन खोलीतल्या पलंगाजवळच्या छोट्या टेबलावर विसरून आल्याचं मला आठवलं. फोनशिवाय घराबाहेर पडणं शक्यच नव्हतं. मी घाईघाईनं खोलीत गेले. खोलीचं दार ढकललं.

त्याचा अंगावर शहारा आणण्यासारखा आवाज झाला, असं वाटलं. खरंतर एरवी तो कसलाही आवाज न करता सहजपणे उघडत असे. मग आताच असं काय झालं, हा विचार मनात येईपर्यंत खोलीत किर्रर्र अंधार असल्याची जाणीव झाली. त्याला डोळे सरावतात न सरावतात, तो पलीकडे माझ्या कपाटाजवळ कोणीतरी उभं असल्याचं दिसलं.

ठार सफेद. त्यामुळंच तर ‘त्यानं’ लक्ष वेधून घेतलं. माझ्या खोलीत कोण शिरलं असेल याचा अंदाज करता येईना. क्षणभर मी जागच्या जागी गोठून गेल्यासारखी उभी राहिले. पायच नाही, तर सारं शरीरच जड झाल्यासारखं वाटायला लागलं. घशाला कोरड पडली. दाराजवळच दिव्याचं बटण होतं. पण ते आठवेपर्यंत थोडा वेळ गेलाच. तेवढ्यात ‘त्यानं’ आपले हात हलवल्यासारखे वाटले. जणू तो मलाच बोलावत होता. पोटात गोळाच उठला. कसाबसा मी दिव्याच्या बटणापर्यंत हात नेला. हात थरथर कापतच होते. त्यामुळं पहिल्या प्रयत्नात बटण दाबू शकले नाही. आता घामाच्या धाराही वाहायला लागल्या होत्या. तेवढ्यात कुठून कोण जाणे पण हातात बळ आलं. बटण दाबलं गेलं...

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.