डॉ. वर्षा वर्तकदोन आठवड्यांपूर्वी माझा डावा खांदा थोडा दुखायला लागला. वेदनाशामक गोळ्या घेऊन आणि विश्रांतीनंतरही खांदा जडच वाटत होता आणि हातही नीट हलवता येत नव्हता. मला कोणीतरी म्हटलं, की ‘फ्रोझन शोल्डर’ असेल. फ्रोझन शोल्डर म्हणजे नक्की काय?.फ्रोझन शोल्डरची सुरुवात थोड्याशा खांदेदुखीपासून होते. या पहिल्या स्थितीमध्ये थोडी जरी हालचाल झाली तरी खांदा दुखतो. अनेकदा रात्री झोपल्यावर हे दुखणं वाढतं. काही काळानंतर दुखणं जरा कमी होतं, पण हात नीट हालेनासा होतो. या दुसऱ्या स्थितीमध्ये अनेक दैनंदिन कामं जमेनाशी होतात. खांद्याच्या सांध्याची दोन्ही हाडे एकत्र बांधणाऱ्या अस्थिबंधाला (लिगामेंट) काही कारणांमुळे सूज आली, तर या सांध्याची मोकळेपणानं हालचाल होण्यात अडचणी येतात. थोडक्यात, खांदा आखडतो किंवा एका जागी फ्रीझ होतो.चाळीस वर्षांवरील व्यक्तींमध्ये आणि पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये या दुखण्याचे प्रमाण जास्त आहे. मधुमेह असणाऱ्या व्यक्तींना फ्रोझन शोल्डर होण्याची शक्यता इतरांपेक्षा पाचपट अधिक असते. थायरॉईड, हृदयविकार, पार्किन्सन्स असणाऱ्या व्यक्तींमध्येही फ्रोझन शोल्डर होण्याची शक्यता अधिक असते.या दुखण्यात खांद्याची हालचाल टाळण्याऐवजी हात हलवत ठेवणं किंवा स्ट्रेचिंग करणं हा यावरचा उत्तम उपाय आहे. पण असे उपाय मनानं, आपापले करू नयेत. अशा वेळी डॉक्टर किंवा फिजिओथेरपिस्टला दाखवणं गरजेचं असतं. या दुखण्यावरच्या पारंपरिक उपचारपद्धतीतील वेदनाशामक गोळ्या किंवा इंजेक्शनमुळे काही काळ वेदना कमी होतील, पण खांदेदुखीचं मूळ कारण कदाचित तसंच राहील आणि हा त्रास परत परत होत राहील. आधुनिक उपचारपद्धतीमध्ये फिजिओथेरपिस्ट ‘शॉकवेव्ह थेरपी’चा अत्यंत परिणामकारक उपयोग फ्रोझन शोल्डरसारख्या दुखण्यांवर यशस्वीपणे करताना दिसत आहेत.अचानक कोपर दुखू लागणं ही समस्या आता खूपजणांना जाणवू लागली आहे. याचं एक नाव प्रचलित झालं आहे, ते म्हणजे ‘टेनिस एल्बो’. कधीही टेनिस न खेळता टेनिस एल्बो कसा काय होऊ शकतो?कोपर बाहेरच्या बाजूला दुखू लागणं, लालसर होणं किंवा थोडीशी सूज येणं अशा प्रकारची लक्षणं दिसू लागतात. पेन नीट धरता येत नाही, दाराचा नॉब गोल फिरवत येत नाही, स्क्रू-ड्रायव्हरनं नीट पिळता येत नाही, कधी कधी तर नीट हस्तांदोलनही करता येत नाही अशा तक्रारी सुरू होतात. .आपल्या कोपराचा सांधा आणि त्याच्या भोवतीचे स्नायू अस्थिबंधांच्या (टेंडॉन) बँडनं घट्ट बांधलेले असतात. या बँडला सूज आली, तर अशा प्रकारच्या कोपरदुखीची सुरुवात होते. शास्त्रीय भाषेत याला लॅटरल एपिकोंडायलिटीस असं नाव आहे.अशा प्रकारची कोपरदुखी कशामुळे होते? तर टेनिस, स्क्वाश, बॅडमिंटन यांसारखे खेळ खेळल्यानं, तसंच पेंटिंग, विणकाम, भरतकाम, कॉम्प्युटरवर सतत काम केल्यामुळे हाताची एकाच प्रकारची हालचाल परत परत होत राहते. आणि तिथूनच टेनिस एल्बोची सुरुवात होते. अशावेळी बर्फाने शेकणं उपयोगी पडतं. फिजिओथेरपीमधील ‘मलिगन’ उपचारपद्धतीचा उपयोग होतो. यामध्ये एक प्रकारचा मसाज केला जातो. तसंच गरज पडल्यास टेपिंग केलं जातं. त्याचबरोबर अल्ट्रासाउंड लहरींचा वापर करून दुखणाऱ्या भागातील रक्तप्रवाह वाढवण्यात येतो. यामुळे सूज लवकर कमी व्हायला मदत होते. सूज आणि दुखणं कमी झाल्यावर या भागातील स्नायू बळकट करण्याचे काही व्यायाम फिजिओथेरपिस्टकडून शिकून घ्यावेत. म्हणजे हे दुखणं परत उद्भवणार नाही. त्याचबरोबर जर आपल्याला हाताचा खूप वापर होणारी कामं करावी लागत असतील, तर ती करताना हाताची पोझिशन कशी असावी, मधेमधे स्ट्रेचिंग कसं करावं यासंदर्भातील अधिक माहिती फिजिओथेरपिस्टकडून जाणून घ्यावी. कारण कोपर दुखू लागल्यावर उपचार करणं किंवा आपलं आवडतं काम बंद करावं लागण्यापेक्षा ते आनंदानं चालू ठेवणं नक्कीच जास्त चांगलं. .महत्त्वाचेः या लेखमालेत प्रश्नकर्त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना, त्यांनीच दिलेल्या माहितीच्या आधारावर उत्तरे देण्याचा प्रयत्न केला आहे. या उत्तरांना वैद्यकीय सल्ला समजू नये. या उत्तरांच्या आधारे कोणतेही वैद्यकीय निर्णय घेऊ नयेत. याबाबतीत अधिक माहिती हवी असल्यास आपल्या डॉक्टरांशी किंवा फिजिओथेरपिस्टशी बोलावे व त्यांच्या सल्ल्यानेच निर्णय घ्यावेत.निवेदन : फिजिओथेरपीविषयी तुम्हालाही काही प्रश्न असल्यास ते साप्ताहिक सकाळकडे saptahiksakal@esakal.com या ई-मेलवर जरूर पाठवा. ई-मेलच्या विषयात ‘फिजिओथेरपीविषयी’ असा उल्लेख करायला आणि सोबत तुमचा पत्ता आणि फोन नंबर लिहायला विसरू नका. तुमच्या प्रश्नांना उत्तरे देण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करू.-----------------------------