Marathi article about jazz music
नेहा लिमये
आधी गडद अंधारात, वेश्यावस्तीत, स्मोकी वातावरणात कुठल्याशा क्लबमध्ये वाजणारं संगीत उघड्यावर, ठिकठिकाणी वाजवलं जाऊ लागलं. हेच ते आफ्रिकन, युरोपियन आणि कॅरिबियन संगीत परंपरांच्या संकरातून तयार झालेलं जॅझ संगीत. अगदी आजही पर्यटक गल्ल्यागल्ल्यांतून सुरू असलेल्या जॅझ संगीत बँड्स, परेड्सचा, त्यातल्या उत्साहानं भारलेल्या वातावरणाचा अनुभव घेण्यासाठी न्यू ऑरलिन्सला मुद्दाम भेट देतात.
I’m in love with you
And all that jazz
You’re my dream come true
And all that jazz