स्टार्टअपच्या विस्तारातील प्रमुख भाग म्हणजे भांडवलाची उभारणी. स्टार्टअपचा मोठ्या प्रमाणात विकास करण्यासाठी गुंतवणूक महत्त्वाची असते. त्यासाठी स्टार्टअपची सविस्तर पण मुद्देसूद माहिती गुंतवणूकदारांना देणे आवश्यक असते.
त्या आधारावर गुंतवणूकदार स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करण्याबाबतचा निर्णय घेतो. ही माहिती प्रभावीपणे सादर करणे म्हणजे ‘पिच डेक.’ त्याला साध्या भाषेत सादरीकरण असे म्हणता येईल.