डॉ ऋतुपर्ण शिंदे, एमडी, डीएनबी, एफएसीसी
किरण, ३४ वर्षांचा मध्यमवयीन आयटी प्रोफेशनल. एकदा कधीतरी छातीत दुखतंय म्हणून कार्डिओलॉजिस्टकडे गेला. तपासण्यांचा भाग म्हणून ईसीजी, 2डी इको आणि स्ट्रेस टेस्ट झाल्या. स्ट्रेस टेस्ट पॉझिटिव्ह आहे, असे दिसून आल्यावर किरणला कोरोनरी अँजिओग्राफीचा सल्ला दिला गेला. यापूर्वी किरणला काहीही त्रास झालेला नव्हता.
रिस्क फॅक्टर म्हणाल तर कामाच्या अनियमित वेळा, कधीतरी धूम्रपान आणि व्यायामाचा अभाव हे रिस्क फॅक्टर आहेत. किरणचे वडील सत्तरीत असताना त्यांची बायपास झालेली आहे. आता त्याने काय करावे, हा प्रश्न त्याला पडलेला आहे.
आता त्याला विविध सल्ले मिळायला लागले आहेत. अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास, आयुर्वेद, गूगल डॉक्टर आणि विविध अशास्त्रीय उपचार या सर्वांमधून कोणाची निवड करायची हा प्रश्न किरणसमोर आहे.