Environment : नवीन वर्षात तुमची पर्यावरणीय जबाबदारी काय?

आपली वस्तूंची मागणी संयमी ठेवणे आणि सजगपणे वस्तू विकत घेणे, यातूनच आपण आपली पर्यावरणीय जबाबदारी पार पाडू शकू.
environment
environmentesakal
Updated on

एक जबाबदार नागरिक म्हणून सर्वात मोठा बदल आपण केला पाहिजे. आपली वस्तूंची मागणी संयमी ठेवणे आणि सजगपणे वस्तू विकत घेणे, यातूनच आपण आपली पर्यावरणीय जबाबदारी पार पाडू शकू.

गुरुदास नूलकर

आपली वस्तूंची मागणी संयमी ठेवणे आणि सजगपणे वस्तू विकत घेणे, यातूनच आपण आपली पर्यावरणीय जबाबदारी पार पाडू शकू.

आर्थिक वृद्धीच्या झगमगाटात निसर्गऱ्हास आणि प्रदूषणाकडे दुर्लक्ष होते. अर्थव्यवस्थेचा पर्यावरणीय ठसा इतका वाढत गेला की याची निष्पत्ती जागतिक तापमानवाढीत झाली.

आर्थिक हव्यासापोटी आपण पुढल्या पिढ्यांना निकृष्ट वसुंधरा बहाल करून जाणार आहोत.

निसर्गसंवर्धनात कितीही पैसा ओतला तरी त्यामधून पुन्हा संसाधने निर्माण होत नाहीत. अर्थनिर्मितीची प्रक्रिया पुन्हा उलटवता येत नाही.

आर्थिक वाढ उपभोगातून होते, आणि बाजारपेठेतील मागणी त्याला कारणीभूत असते. आणि म्हणूनच एक जबाबदार नागरिक म्हणून सर्वात मोठा बदल आपण केला पाहिजे.

आपली वस्तूंची मागणी संयमी ठेवणे आणि सजगपणे वस्तू विकत घेणे, यातूनच आपण आपली पर्यावरणीय जबाबदारी पार पाडू शकू.

environment
मी दरवर्षी संकल्पांची यादी करते आणि दुसऱ्याच गोष्टींना प्राधान्य देते.. (New Year Resolution)

आपण काय करू शकतो यासाठी काही सूत्रे:

काही विशिष्ट वस्तू नाकारणे (Refuse) : निसर्गाला घातक असलेल्या वस्तू नाकारल्या तर त्यांचे उत्पादन कमी होईल. प्लॅस्टिक शॉपिंग पिशव्या, बाटलीबंद पाणी, डिस्पोजेबल कप, पाम तेलात केलेले पाकीटबंद खाऊ, फटाके अशा गोष्टी नक्कीच नाकारता येतात.

सातासमुद्रापलीकडून आयात केलेल्या वस्तूंपेक्षा स्थानिक उत्पादनांची निवड पर्यावरणाला अधिक योग्य असते.

गरजा कमी करणे (Reduce) : काही वस्तू नाकारता येत नाहीत. त्यांचा वापर कमी करता येतो. पाणी, पेट्रोल, कागद, वीज, शीतपेये, साफसफाई कामात वापरल्या जाणाऱ्या रासायनिक वस्तू यांचा वापर ठरवून कमी करता येतो.

आठवड्यातील एक-दोन दिवस तरी बस किंवा सायकलने प्रवास करणे, एका घरात एक टीव्ही असणे, गार पाण्यासाठी माठाचा वापर, अंघोळीसाठी सोलर हिटर वापरणे अशा काही गोष्टी शक्य असतात.

कॉम्प्युटर, मोबाईल फोन, गाड्या, टीव्ही अशा वस्तू वरचेवर न बदलता, असलेल्या वस्तूंचा अधिक काळ वापर करणे.

पुनर्वापर (Reuse) : वस्तूंचे आयुष्य संपते, हे खरे आहे. पण कित्येक वस्तूंचा पुनर्वापर करता येतो. उदाहरणार्थ, गाडीच्या टायरपासून मोढे बनतात, प्लॅस्टिक बाटल्यांचा कुंड्यांत ठिबक सिंचनासाठी उपयोग होतो, भेटवस्तू बांधून आलेल्या प्लॅस्टिकच्या कागदांचा पुन्हा वापर होतो.

environment
Fire Crackers : फटाके तुमच्या शरीरासाठी किती घातक?

वस्तू दुरुस्त करून वापरणे (Repair) : प्रत्येक घरात अडगळ असतेच. त्यात अनेक वस्तू पडून असतात. त्या दुरुस्त करून स्वतःच वापरणे किंवा एखाद्या गरजू माणसाला देणे, यात काहीच अवघड नाही.

पुनर्प्रक्रिया करणे (Recycle) : आपण वर्तमानपत्राची रद्दी जमवून ठेवतो, तसेच प्लॅस्टिक वेगळे साठवून ते पुनर्प्रक्रिया केंद्रात पाठविणे सोपे असते. फाटके कपडे, विद्युत उपकरणे (e-waste) याचे तर आपल्याला पैसे मिळतात.

पर्यावरणपूरक गोष्टींचा (Environment friendly products) वापर वाढविणे : सेंद्रिय अन्नधान्य, रसायनविरहित घरगुती वापरातील वस्तू, स्थानिक खाद्यपदार्थ अशा वस्तूंची निवड योग्य आहे.

कचरा व्यवस्थापन (Waste management) : निसर्गनिर्मित आणि सेंद्रिय कचऱ्याचे कम्पोस्टिंग घरातच करणे, प्लॅस्टिक कचरा वेगळा साठवून तो पुनर्प्रक्रियेस पाठवणे, इलेक्ट्रॉनिक कचरा वेगळा साठवणे यात काहीच अवघड नसते.

-----------------

environment
इतक्या लहान मुलांना फटाके वाजवायचे नसतात हे कसं समजवायचं?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.