आरोग्याच्या दृष्टीने चरबी कितीही महत्त्वाची असली तरी ती योग्य प्रमाणात नसेल, तर आरोग्यामध्ये उलथापालथ करू शकते. आहारातील चरबीचे प्रमाण खूप वाढल्यास, शरीरात अतिरिक्त चरबी जमा होऊन लठ्ठपणा येऊ शकतो.
त्यातूनच मधुमेह, हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधीचे विकार आणि काही कर्करोग उद्भवण्याची शक्यता वाढू शकते. जागतिक पातळीवर झालेल्या काही संशोधनांच्या निष्कर्षांनुसार, बीएमआय (बॉडी मास इंडेक्स) कितीही योग्य असला, तरी शरीरातील चरबीची टक्केवारी जर जास्त असेल, तर त्यामुळे अकाली मृत्यू होण्याचा धोका वाढण्याची शक्यता असते.