मीराबाईंच्या संतत्वापर्यंतच्या प्रवासातील विविध पदर उलगडले, तर मीराबाई अबला संत नसून राजसत्तेला आणि परंपरांच्या जोखडाला आव्हान देणाऱ्या समर्थ संत होत्या, त्यांच्या अस्तित्वाला धोका करू पाहणाऱ्या आणि अस्मितेला धक्का लावू पाहणाऱ्यांना पुरून उरणाऱ्या होत्या याची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही.