इरावती बारसोडे
दरवर्षी पावसाळ्याचे चार महिने, ‘आपल्याला चष्मा का आहे?’ हा प्रश्न रोज एकदातरी मनात डोकावतोच. आणि पावसाळा संपला की प्रश्नही गायब होतो, हा मुद्दा वेगळा. पण तरी ते चार महिने, पावसाळ्यापुरता तरी चष्मा नसता तर काम किती सोप्पं झालं असतं, असं वाटून जातं. चष्मेवाल्यांचं दुःख स्वच्छ दृष्टी (फक्त चष्मा नसतो म्हणून ‘स्वच्छ दृष्टी’ बरं का!) असलेल्यांना कध्धी कध्धी कळणार नाही.