योगिराज प्रभुणे, सागर गिरमे
आक्काबाई मातीचे काळेकुट्ट खडे कुडूम-कुडूम करत दिवसभर खात राहते. त्या मातीला फार काही आकर्षक वास नाही. चवही खडू खाल्ल्यासारखी. तरीही आक्काबाई दिवसभरात पुड्याच्या पुड्या खाते. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात अशा लाखो आक्काबाई आहेत. हा एक मानसिक रोगच.
दुकानांमधून सहज मिळणारी ही माती आता ऑनलाइनही मागवता येते. काय आहे हे नेमकं व्यसन? विज्ञान या माती खाण्याकडे कसं पाहतं? अशी माती खाण्याचे आरोग्यावर काय आणि किती परिणाम होतात? याबरोबरच अशी माती खाण्यातून निर्माण होणाऱ्या सामाजिक आणि भावनिक गुंतागुंती... या सगळ्यावर एक दृष्टिक्षेप...