‘मला सांगा तुमच्या देशातल्या तरुणांच्या ओठांवर कोणती गाणी आहेत; मी तुम्हाला तुमच्या देशाचे भवितव्य सांगतो’, असे कोण्या फ्रेंच की जर्मन महाकवीने म्हणून ठेवले आहे म्हणे.
एखाद्या परिस्थितीत माणसं कशी वागतात त्यावरून त्या माणसांची किंवा ती माणसं ज्या समूहाचा भाग असतात त्या समूहाच्या सामूहिक शहाणिवेची पारख करण्यापुरता हा मुद्दा लक्षात घेतला, तर सध्याच्या काळात त्या महाकवीच्या या उद्गारांची एक आवृत्ती, ‘मला तुमच्या शहरातली वाहतूक दाखवा, मी तुम्हाला तुमची सांस्कृतिक उंची सांगेन’ अशीही असू शकते.