साप्ताहिक
भवताल-वेध : जगात प्लास्टिकवर बंदी येणार? काय आहे जगातील पहिला प्लॅस्टिक विषयक करार?
एप्रिल २०२४च्या शेवटच्या आठवड्यात पार पडलेली या मालिकेतील चौथी परिषद होती. अंतिम आणि पाचवी परिषद या वर्षअखेर नोव्हेंबरमध्ये नियोजित आहे
डॉ. महेश शिरापूरकर
जागतिक प्लॅस्टिक (बंदी) करार अस्तित्वात आला, तर तो जगातील पहिला प्लॅस्टिक विषयक करार ठरेल. या कराराचा मसुदा तयार करण्यासाठी मागील दोन वर्षांपासून परिषदांचे आयोजन करून जागतिक वाटाघाटी सुरू आहेत. एप्रिल २०२४च्या शेवटच्या आठवड्यात पार पडलेली या मालिकेतील चौथी परिषद होती. अंतिम आणि पाचवी परिषद या वर्षअखेर नोव्हेंबरमध्ये नियोजित आहे.