आता कृत्रिम तंत्रज्ञानाच्या आधारे जर माणसाचा स्वभावच बदलता येणार असेल तर त्याचा परिणाम त्याच्या अन्य व्यवहारांवरही होणार. मानवी स्वभावाच्या भवितव्याचा संबंध अशा प्रकारे मानवाच्या नीतिमूल्यांशी पोहोचतो व त्यातून स्वायत्ततेशी पोहोचतो. म्हणून तर अशा तंत्रज्ञानाच्या उपयोगाबाबत ‘क्रिटिकल’ असायला हवे.