अगदी सुरुवातीच्या काळात तर मतदार यादीमध्ये स्वतःचं नाव नोंदवून घ्यायलाही महिला तयार नसायच्या. १९५१-५२ साली झालेल्या पहिल्या निवडणुकीत तर अमक्याची बायको, तमक्याची आई अशीच नावं नोंदवावीत म्हणून अनेक महिला ठाम होत्या, अशा आठवणी आजही सांगितल्या जातात.
त्यांचं स्वतःचं नाव नोंदवलं गेलं नाही म्हणून जवळपास २८ लाख महिलांची नावं पहिल्या मतदार यादीत नव्हतीच म्हणे. त्यानंतर महिला मतदारांच्या नाव नोंदणीसाठी निवडणूक आयोगाला जनजागृती करावी लागली होती. तिथपासून सुरू झालेला महिला मतदार नोंदणीचा प्रवास..!