डॉ. आशुतोष जावडेकर
साधारणतः लहानपणी तुम्ही वाचक होत असताना, ज्या संवेदना तुमच्या आसपास असतात, त्या तुम्हाला जवळच्या वाटतात. काळ पुढे सरकत राहतो. आत्ताच्या मुलांना किंडल हातात घेऊनदेखील तितकंच रोमँटिक वाटतं! मला स्वतःला छापील पुस्तक आणि किंडल दोन्ही वाचायला आवडतं. एकच पुस्तक किंडलवर वाचताना आणि छापील आवृत्ती वाचताना वेगळं काहीतरी वाचकाला देऊ शकतं..