भूषण महाजन
हिंडेनबर्ग संस्थेने अलीकडेच ‘सेबी’च्या अध्यक्षा माधवी पुरी बुच यांच्यावर वैयक्तिक हल्ला केला. अदानी समूहात गुंतवणूक असल्यामुळेच ‘सेबी’च्या अध्यक्षांनी अदानी समूहाच्या गैरव्यवहारासंबंधी नमते धोरण घेतले, असा त्यांनी आरोप केला.
‘सेबी’च्या अध्यक्षपदी नेमणूक व्हायच्या आधी केलेली ही गुंतवणूक आहे व ती लागलीच मी पतीच्या नावे केली आहे, हे बुच यांचे विधान गुंतवणूक नाकारत नाही.
पण हे सारे वाटते तितके सरळ नाही. शेवटी या संशयपिशाच्चाचा बळी कोण, हे वाचकांनीच ठरवायचे आहे. ‘सेबी’ अध्यक्षांवर संक्रांत येते का, हे बघणे उद्बोधक ठरेल.