ज्येष्ठांनो, ठेवींच्या व्याजात भागणार कसे?
ज्येष्ठांनो, ठेवींच्या व्याजात भागणार कसे?esakal

ज्येष्ठांनो, ठेवींच्या व्याजात भागणार कसे?

अशा परिस्थितीत जमा-खर्चाची तोंडमिळवणी करायची कशी?..
Published on
Summary

बँकेत मुदत ठेवी करायच्या आणि त्यांच्या व्याजावर काटकसरीने निर्वाह करायचा, असे अनेक ज्येष्ठ नागरिकांचे नियोजन असते; पण अलीकडच्या काळात ठेवींचे व्याजदर खूप कमी झाल्याने हाती येणारे उत्पन्न कमी झाले आहे. अशा परिस्थितीत जमा-खर्चाची तोंडमिळवणी करायची कशी?..

नोकरीतील सेवानिवृत्तीनंतर व्यक्ती कामाच्या धावपळीतून तशी निवांत होते. मुलांचे शिक्षण, लग्नकार्ये, गृहकर्ज यांसह विविध जबाबदाऱ्यांतून ती बहुधा मुक्त झालेली असते. त्यामुळे पुढचे आयुष्य दगदगीशिवाय शांतपणे व्यतीत करण्याचे स्वप्न अनेक जण पाहात असतात. तथापि, या टप्प्यावर सगळ्यांत महत्त्वाचा मुद्दा असतो आर्थिक नियोजनाचा. जुन्या सरकारी कर्मचाऱ्यांना महागाईच्या दरानुसार वाढत जाणारी पेन्शन मिळते. खासगी क्षेत्रातील निवृत्तांना मात्र हा भक्कम आधार नसतो. त्यांची पेन्शन अगदीच तुटपुंजी असते. अशा परिस्थितीत उर्वरित आयुष्यात खर्चाचा ताळमेळ बसवायचा कसा, असा प्रश्न त्यांच्यापुढे असतो.

मुद्दलाची काळजी

निवृत्तीच्या वेळी मिळालेला कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ), ग्रॅच्युइटी, गुंतवणूक किंवा दागिन्यांची आवड म्हणून केलेली सोनेखरेदी, जीवन विमा पॉलिसीची रक्कम, बँकांतील- टपाल खात्यातील बचत ठेवी अशी त्यांची सर्वसाधारण पुंजी असते. ते राहात असलेले घर स्वमालकीचे असले, तरी त्यातून उत्पन्न मिळत नाही. पगाराच्या माध्यमातून दरमहा होणारी पैशांची आवक थांबलेली असते. आजवरचे जे ‘संचित’ आहे, त्यावरच त्यांची पुढची आर्थिक वाटचाल होणार असते. त्यामुळे गुंतवणुकीवर जास्त परतावा मिळविण्यासाठी प्रयत्न करताना कोणत्याही परिस्थितीत मुद्दलाला धक्का पोचणे त्यांना परवडणारे नसते.

Loading content, please wait...