डॉ. अतुल देशपांडे
शेअर बाजाराचे मूल्यांकन काय राहील हे जाणून घेण्याची सोपी पद्धत म्हणजे वॉरन बफेट यांचा सूचक अर्थात इंडिकेटर. हा सूचक म्हणजे आहे एक गुणोत्तर किंवा प्रमाण.
हा सूचक व्यक्त केला जातो टक्केवारीत. सूचिबद्ध झालेल्या कंपन्यांच्या सर्व शेअरच्या बाजार भांडवलीकरणाचे ‘जीडीपी’शी असलेले टक्केवारीतील प्रमाण. म्हणजे किंमत-विक्री वा आर्थिक मूल्य-विक्री यासारख्या गुणोतरासारखे.
बफेट यांचा हा सूचक बाजाराच्या मूल्यांकनासाठी वापरली जाणारी सोपी पद्धत या श्रेणीत मोडतो. बफेट यांचा सूचक आणि गुंतवणूकदारांकडून ‘सेन्सेक्स’च्या वाढीबाबत अंदाज बांधलेली उद्दिष्टे या दोहोंत अर्थपूर्ण संबंध आहे.