प्रसाद घारे
आता केवळ भारतातच नाही, तर जगभरात आयुर्वेद उपचारपद्धती आणि आयुर्वेदिक औषधांवर शिक्कामोर्तब झाले आहे.
यामुळेच आयुर्वेद उपचारपद्धती आणि आयुर्वेदिक औषधांची महाराष्ट्रातील आणि देशातील बाजारपेठ झपाट्याने विस्तारत आहे.
सांडू, विको, धूतपापेश्वर, बैद्यनाथ, डाबर, पतंजली, संतुलन अशा अनेक नामवंत कंपन्या या क्षेत्रात कार्यरत आहेत. याच कंपन्यांच्या बरोबरीने गेल्या ४३ वर्षांपेक्षा अधिक काळ आयुर्वेदिक औषध या क्षेत्रात कार्यरत असणारी कोल्हापूरमधील एक नामवंत कंपनी म्हणजे
‘एसजी फायटो फार्मा प्रा.लि.’ दिलीप गोविंद गुणे यांनी तरुण वयात कष्ट, जिद्द, परिश्रमाचे खतपाणी घालून ही कंपनी उभी केली. त्याचीच ही यशोगाथा...