सुधीर जोगळेकर
ग्रंथपाल, ग्रंथलेखक, ग्रंथविक्रेता, ग्रंथप्रसारक, ग्रंथप्रकाशक असे ग्रंथ व्यवसायाशी संबंधित अनेक व्यवसाय-पर्यायी शब्द आपण नेहमीच वाचत-ऐकत असतो.
यातल्या प्रत्येक शब्दाकडे किंवा व्यवसायाकडे चरितार्थाचं साधन म्हणून पाहणारे अनेक जण आपण पाहतो, परंतु चरितार्थाचं सोडा, पदराला खार लावून ग्रंथ व्यवसाय करणारी, ग्रंथव्यवहार संस्कृती गावोगावी रुजावी यासाठी प्रयत्न करणारी आणि वाचनसंस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी जिवाचा आटापिटा करणारी व्यक्ती अपवादानं दिसते.
माझ्या पाहण्यात आलेली अशी व्यक्ती म्हणजेच डोंबिवलीच्या पै फ्रेंड्स लायब्ररीचे पुंडलिक पै. त्यांच्या लायब्ररीचं यंदा ३८वं वर्ष. पै यांच्या ग्रंथालय संचालनाचा हा परिचय...