अलीकडच्या काळात महिलांचे उद्योगक्षेत्रातील प्रमाण वाढत असले, तरीही काही आव्हानात्मक, नावीन्यपूर्ण संकल्पनांवर आधारित उद्योगांमध्ये उतरणाऱ्या महिलांचे प्रमाण अत्यल्प आहे. असेच एक आगळेवेगळे क्षेत्र आहे, ऊर्जा वितरणाचे.
या क्षेत्रात छोट्या-मोठ्या उद्योगांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी इंधन पुरवठा करण्याची नावीन्यपूर्ण संकल्पना प्रत्यक्षात उतरवली ती ‘रिपॉस एनर्जी’च्या संस्थापक व चीफ व्हिजनरी ऑफिसर अदिती भोसले-वाळुंज यांनी.
त्यांच्या या आगळ्यावेगळ्या उद्योगाची दखल घेऊन नुकताच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांचा सन्मान केला. राष्ट्रपतींनी भेट घेतलेल्या देशातील २५ निवडक महिला उद्योजिकांमध्ये अदिती यांचा समावेश होता. ‘सकाळ मनी’साठी अदिती भोसले-वाळुंज यांची प्राची गावस्कर यांनी घेतलेली ही विशेष मुलाखत...