सध्या सगळीकडे गरीब आणि श्रीमंत यांच्यातील दरी वाढताना दिसते आहे. ही दरी कमी करण्यासाठी काय करता येईल,याबद्दल जगभरातील अर्थतज्ज्ञ विचार करत असतात. निरनिराळ्या कल्पना लढवत असतात. त्यातलीच एक म्हणजे सुपर रिच टॅक्स (Super Rich Tax)
अतिश्रीमंत व्यक्तींकडे सर्वसामान्य नागरिकाच्या प्रमाणात कितीतरी अधिक मालमत्ता असते. ती त्यांच्या वारसांकडे जाते. त्यामुळेच एखाद्या अतिश्रीमंत घरातील नुकत्याच जन्मलेल्या बाळाकडेसुद्धा प्रचंड संपत्ती असते जितकी की त्याच समाजातील सामान्य कष्टकऱ्याकडे त्याच्या वृद्धत्वातही नसते. हा फरक लोकांना कायमच टोचणारा असतो. त्यामुळेच गरीब आणि श्रीमंत यांच्यात आर्थिक दरी वाढत जातेच, सोबतच मानसिक दरीही वाढते