शिरीष देशपांडे
आजकाल आपण सर्व जण आणि विशेषतः तरुणवर्ग हा संगणक व इंटरनेटच्या माध्यमातून आपले आर्थिक, कायदेशीर आदी सर्व व्यवहार करतो. आपला संपूर्ण पत्रव्यवहार, वैयक्तिक माहितीचा खजिना हा आपल्या पश्चात आपल्या योग्य त्या वारसांना सुरक्षितपणे मिळेल याचा विचार करणे आवश्यक आहे.
आपण ऑनलाइन बँक अकाउंट, गुंतवणूक खाते, शेअर डी-मॅट खाते, क्रेडिट कार्ड, एटीएम कार्ड, किंवा अन्य तत्सम ऑनलाइन सुविधांचा वापर करत असाल, तर आपल्या जोडीदाराला त्या सर्व गोष्टींची सविस्तर माहिती नोंद करून समजावून सांगा.
या सर्व गोष्टी आपण ऑनलाइन करत असाल, तरीही हे सर्व प्रत्यक्षात जॉइंट असावे आणि त्या सर्वांचे नॉमिनेशनही करावे. थोडक्यात, आपल्या डिजिटल ॲसेटची योग्य ती काळजी घेणे महत्त्वाचे आहे.