त्या’ दोन मूर्ती उद्ध्वस्त केल्याचे मान्य, वारसास्थळ जतन करण्याची ग्वाही; पण तालिबानचे पोकळ आश्वासन असल्याचे मत
तालिबानने २००१ मध्ये ‘त्या’ दोन पुरातन भव्यदिव्य मूर्ती डायनामाईटने उडवून दिल्या. त्याला २०२१ मध्ये वीस वर्षे झाली आहेत. आता तेथे पुन्हा सत्तेवर तालिबान आले आहे. आपल्या कृत्याबद्दल त्यांना उपरती झाली आहे. अफगाणिस्थानाच्या बामियान खोऱ्यातील जगप्रसिद्ध अशा दोन बुद्ध मूर्ती जमीनदोस्त केल्यानंतर तालिबान्यांना उपरती झाली आहे. मात्र, आता बुद्धांच्या मूर्तीच्या ठिकाणी (मूर्ती नाहीतच, पर्वतात रिकामे असलेले दोन मोठे कोनाडे) बंदुकधारी दोन सैनिक (?) तैनात केले आहेत.