डॉ.अनिल पडोशी
देश आर्थिक आघाडीवर मोठी स्वप्ने पाहात असताना ती पूर्ण करायची तर उत्तर प्रदेश या महत्त्वाच्या व मोठ्या राज्याच्या विकासाचा मुद्दा महत्त्वाचा ठरणार आहे.
अयोध्या येथे जानेवारीत श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. देशभर सर्व प्रकारच्या प्रसारमाध्यमांमध्ये श्रीराममंदिर या एकाच विषयाची सातत्याने चर्चा होती.
पण श्रीराम मंदिराच्या उभारणीच्या निमित्ताने भारतावर आणि विशेषत: उत्तर प्रदेश या राज्यावर आर्थिक परिणाम काय होऊ शकतील, हा मुद्दा चर्चेमध्ये फारसा आला नाही.
संभाव्य आर्थिक परिणामांचा सांगोपांग खल झाला असता तर अधिक बरे झाले असते. विशेषत: २०२७-२८ पर्यंत आपली अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलरची करण्याचे जे आपले उद्दिष्ट आहे ते साधण्यासाठी श्रीराम मंदिराचे काय योगदान असू शकेल, यावर पुरेसे मंथन झालेले नाही.