Lale and Geeta
Lale and Geetasakal

मृत्यूच्या दारात फुलली होती 'सिक्रेट' लव्हस्टोरी

Published on

मृत्यूच्या जाळ्यात प्रेमाचे रोप वाढू शकते? हत्येच्या ठिकाणी मरणसाठी मध्यभागी उभा असलेल्या एखाद्यासाठी एखाद्याचे हृदय धडधडू शकते? जेव्हा जीव वाचवण्याची चिंता मनात असते, तेव्हा त्या वेळी स्वत:चा जीव वाचविण्यापेक्षा आपल्या प्रेमाच्या शोधास प्राधान्य देतो का? या सर्वांची उत्तरं तुमच्याकडे नसल्यास कदाचित प्रेमाच्या अथांग शक्तीची तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही. प्रेम ते आहे ज्याच्यात दैवी शक्ती असते, जगाला बदलून टाकण्याची ताकद प्रेमात असते. अशीच एक कथा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ही कथा खूप रंजक असून 70 वर्षांहून अधिक जुनी आहे.

हा काळ होता महायुद्धाच्या दरम्यानचा. जर्मनीमध्ये हिटलरची सत्ता होती, ज्याने मानव जातींचा सर्वांत मोठा संहार केला. कोट्यवधी लोकांना होलोकॉस्टच्या नावाखाली ताब्यात घेतले. त्यापैकी हजारो लोकांना गॅस चेंबरमध्ये ठार मारण्यात आले. इतर हजारो लोक नजरकैद कॅम्पमध्ये थंडी व उपासमारीने मृत्युमुखी पडले.

क्रूरकर्माचे सर्वांत मोठे केंद्र

हिटलरच्या क्रूरकर्माचे सर्वांत मोठे केंद्र म्हणजे पोलंडमधील औशविट्‌स. हे नाझी राजवटीतील सर्वांत मोठे कन्सन्ट्रेशन कॅम्प (नजरकैद कॅम्प) होते. नाझी गुप्तहेर एजन्सी एसएस येथे युरोपमधून यहुद्यांना (कैद्यांना) पकडून आणत. यापैकी अनेकांना कॅम्पमध्ये पोचताच गॅस चेंबरमध्ये ठार मारण्यात आले. त्याच वेळी, बरेच लोक असे होते ज्यांना अनेक महिन्यांपासून गुदमरत जगावे लागले. त्यांच्या डोक्‍यावरचे केस काढले जायचे. कपडे काढून चिंधी नेसायला दिली जायची. मग रात्रंदिवस काम करून घेतले जाई आणि मग त्यांना जिवंत राहण्याइतके अन्न खायला दिले जायचे.

ती लोकं पोटभर खाण्यासाठी तळमळत असत. लोकं त्यांच्या प्रियजनांपासून दूर, आपल्या आईवडील, मुले, नातेवाईक यांच्यापासून परक्‍या लोकांमध्ये राहात असत. जे जास्त कमकुवत व्हायचे, ज्यांच्याकडून काम करवून घेतले जात नव्हते त्या एकेकांना गॅस चेंबरमध्ये नेऊन गुदमरून मारले जायचे.

ऑशविट्‌समध्ये हिटलरचं क्रूरकर्म बऱ्याच वर्षांपासून सुरू होतं. 1945 मध्ये दुसरे महायुद्ध संपल्यानंतर सोव्हिएत युनियनच्या सैन्याने जेव्हा ऑशविट्‌स ताब्यात घेतलं तेव्हा ही प्रक्रिया संपुष्टात आली.

कैद्याची संख्या हातावर लिहिली जायची...

औशविट्‌स कॅम्पचे दृश्‍य खूपच भयानक असायचे. येथे पोचल्यावर लोकांची ओळख, म्हणजेच त्यांचे नाव पहिल्यांदा काढून घेण्यात यायचे. लोकांच्या हातावर कैदी क्रमांक गोंदवले जात असे. त्या दिवसापासून कोणीही स्वत:चे नाव घेत नव्हते. ते फक्त त्यांच्या नंबरवरून ओळखले जात असत. औशविट्‌सच्या कॅम्पध्ये असा एक कैदी होता, ज्याचा नंबर 32407 होता. या कैद्याच्या कथेवर एक पुस्तक लिहिले गेले आहे, ज्याचे नाव "द टॅटूइस्ट ऑफ ऑशविट्‌स' म्हणजेच ऑशविट्‌सचा टॅटूवाला.

औशविट्‌सच्या कैदी नंबर 32407 चे खरे नाव लुडविग लेल आइसनबर्ग होते. लुडविग एक यहूदी होता. त्याचा जन्म 1916 मध्ये स्लोव्हाकियात झाला होता. ही गोष्ट एप्रिल 1942 ची आहे. त्यावेळी लुडविग ऊर्फ लेल 26 वर्षांचा होता. एके दिवशी अचानक नाझी पोलिस त्याच्या दारात आले. पुढे काय होणार आहे याची लेलच्या कुटुंबाला कल्पनाही होती. त्या वेळी लेल बेरोजगार होता. त्याचे लग्नही झाले नव्हते. तर, लेलने स्वत:ला पुढे करून ठामपणे सांगत, की तो नाझी सैन्यासाठी काम करण्यास तयार आहे. लेलने अशी आशा केली की असे केल्याने तो आपल्या कुटुंबास नाझींच्या त्रासापासून वाचवेल.

काय काम करत होते हिटलरचे कैदी..?

लेलला अटक करून पोलंडमधील ऑशविट्‌स कॅम्पमध्ये आणण्यात आले. तेथे 32407 हा नंबर हातावर गोंदवण्यात आलं. लेलला उर्वरित कैद्यांसमवेत काम करायला सांगितले गेले. तेथील कैदी बाहेरून येणाऱ्या इतर कैद्यांच्या तुरुंगात ठेवण्यासाठी इमारती बांधत असत.औशविट्‌स कॅम्पमध्ये पोचल्यानंतर काही दिवसांनी लेलला टायफॉइड झाला. त्या काळात फ्रान्समधील यहुदी कैदयाने त्याची काळजी घेतली. त्याचे नाव पेपन होते. तुरुंगात असताना पेपनने लेलला शांत बसायला शिकवले. तेथील सैनिकांशी भांडण करू नको आणि तुझे काम शांतपणे करत राहा. कोणाशी जास्त बोलू नको. पेपनला टॅटू बनवायला येत असे. हे काम त्याने लेललाही शिकवले.

एके दिवस पेपन अचानक गायब झाला. तो लेलला पुन्हा कधीच भेटला नाही. लेल टॅटू बनवायला शिकला होता. म्हणून नाझी इंटेलिजेन्स पोलिसांचे कमांडर्स म्हणजेच एसएसने त्याला नव्याने आलेल्या कैद्यांच्या हातांवर नंबर गोंदवण्याची जबाबदारी दिली. लेलला बऱ्याच भाषा येत होत्या. त्याला जर्मन, रशियन, फ्रेंच, स्लोव्हाकियन, हंगेरियन आणि पोलिश भाषा माहित होत्या. म्हणूनच त्याला टॅटू बनवण्याचे काम देण्यात आले होते. टॅटू बनविण्यासाठी लेलला सामानाची भरलेली पिशवी दिली होती. तो उर्वरित कैद्यांव्यतिरिक्त आपल्या खासगी (सेपरेट) खोलीत राहात असे. त्याला अन्न देखील जास्त दिले जायचे. त्याच्या देखरेखीखाली एक हवालदार (शिपाई) तैनात होता.

कैद्यांची विभागणी कशी ..?

लेलचे आयुष्य तेथील बाकीच्या यहुदी कैद्यांपेक्षा चांगले झाले होते. पण मृत्यूची भीती नेहमीच त्याच्या डोक्‍यावर होती. तेथील कैदी जेव्हा रात्री झोपलेले असायचे तेव्हा त्यांना दुसऱ्या दिवशी आपली पहाट होईल की नाही याची खात्रीही नसायची. लेलचे आयुष्य मृत्यूच्या सावलीतही व्यतीत होत होते. जवळच्या गॅस चेंबरमध्ये काय चालले आहे हे त्यालासुद्धा माहीत होते. लेल दररोज येणाऱ्या कैद्यांची गर्दी पाहायचा. त्यांच्या हातांवर सुईने नंबर गोंदवत होता. तो लोकांची ओळख पुसायचा. कैदी म्हणून त्यांना नवी ओळख देत होता. ज्या कैद्यांना येताच गॅस चेंबरमध्ये ठेवले जायचे, त्यांच्या हातावर टॅटू बनवत नसे. कुठल्या व्यक्तीचा आज शेवटचा दिवस आहे हे लेलला माहीत असायचं.

नाझी कमांडर जोसेफ मेंगेले अनेकदा ऑशविट्‌स कॅम्पमध्ये कैद्यांची विभागणी करत असत. कॅम्पमध्ये येताच कोणत्या माणसांना ठार मारायचे आणि काम करताना कुणाला तडफडून मारणे आवश्‍यक आहे हे तो ठरवत असे. तो भुकेलेल्या, अनाथ लोकांचे फोटो देखील काढायचा; जेणेकरून तो त्याच्या कर्तृत्वाचा पुरावा म्हणून त्यांच्या साहेबांकडे दाखवू शकेल. पुढची दोन वर्षे लेल आयसनबर्गने ऑशविट्‌स कॅम्पमधील कैद्यांच्या हातांवर नंबर नोंदवत होता. यात सहसा मुले आणि दुर्बल स्त्रिया असत. त्यांचे थरथरलेले हात आणि भीतीने डोळे भरून गेलेले पाहून, लेल देखील घाबरायचा.

जेव्हा एका महिलेच्या हातावर टॅटू काढायचा होता...

टॅटू बनवण्याच्या या प्रक्रियेत एक दिवस एक विचित्र योगायोग घडला. ही गोष्ट जुलै 1942 मधील आहे, जेव्हा लेलकडे पेपर देण्यात आला. कैदी क्रमांक 34902 चा. नव्याने आलेल्या कैद्याच्या हातावर त्याला हा नंबर गोंदवायचा होता. कैदी एक स्त्री होती. हे लेलसाठी काही नवीन नव्हते. तो अनेकदा महिलांच्या हातांवरही त्यांचा नंबर गोंदवायचा. पण, या मुलीत काहीतरी वेगळीच गोष्ट होती. हा लेलच्या गोंदण कामाची सुरवातीचा टप्पा होता. हात थरथर कापत होते. त्यावेळी पेपनने त्याला घाबरू नकोस, फक्त तुझे काम कर असे सांगितले.

लेलने मुलीचा हात हातात घेतला आणि गोंदवायला सुरवात केली. यादरम्यान त्याचे डोळे त्या मुलीला भिडले. त्या मुलीमध्ये एक वेगळीच गोष्ट होती. दोघांचे डोळे एकमेकांना पाहिल्यावर असं वाटत होतं की, लेल जेव्हा त्या मुलीच्या हातावर नंबर गोंदवत होता, तेव्हा त्या मुलीने स्वत:चे हृदय त्याच्या मनात (हृदयात) गोंदवून घेतले. जरा कल्पना करा, ऑशविट्‌सच्या कॅम्पमध्ये जिथे मृत्यू समोर दिसायचा, तेथे दोन मनं भेटली आणि एकमेकांसाठी धडधडू लागली. त्या मुलीचे नाव गीता होते.

आतापर्यंत लव्ह स्टोरी का लपवली गेली...?

लेल आणि गीताची लव्हस्टोरी "द टॅटूस्ट ऑफ ऑशविट्‌स' या पुस्तकातून समोर आली आहे. ऑस्ट्रेलियन चित्रपट निर्माते हीदर मॉरिस यांनी हे पुस्तक लिहिले आहे. मॉरिसने कित्येक वर्षांपूर्वी लेलची भेट घेतली होती. जेव्हा लेल ऑशविट्‌सच्या कॅम्पमध्ये असल्याचे समजले तेव्हा मॉरिसने पहिल्यांदा ते अनुभव चित्रित करण्याचा विचार केला. वर्षानुवर्षे लेल आपल्या मनामध्ये हे रहस्य लपवत होता की तो नाझी कॅम्पमध्ये टॅटू बनवत असे. त्याला नाझींचा साथीदार मानले जाईल, अशी भीती लेलला होती. जीव वाचवण्यासाठी तो हे काम करायचा. लेलची अगोदर प्रेयसी आणि नंतर पत्नी बनलेल्या गीताला नेहमीच सत्य सांगण्यापासून थांबवले गेले. परंतु 2003 मध्ये जेव्हा गीताचे निधन झाले, तेव्हा लेलने विचार केला की मरण्यापूर्वी त्याने आपले रहस्य जगाला सांगावे. मग हीदरचे त्याच्या घरी येणे-जाणे सुरू झाले. म्हणून लेलने हीदरला 2006 मध्ये आपला मृत्यू होण्यापूर्वी औशविट्‌स कॅम्पपासून त्यांच्या प्रेमापर्यंत संपूर्ण कथा सांगितली.

हातात कैदी क्रमांक 34902 टॅटू काढत असताना, लेलला त्या मुलीचे नाव गीता असल्याचे समजले. दोघेही प्रेमात पडले. गीताला औशविट्‌सजवळील बिरकेनूच्या नजरबंदीमध्ये ठेवण्यात आले होते. आपल्या सुरक्षारक्षकाच्या मदतीने लेलने गीताला पत्र पाठवायला सुरवात केली. लेल गीताची खूप काळजी घेत असे. कैद्यांना फारच कमी अन्न मिळत असे, पण टॅटू काढत असल्यामुळे लेलला पूर्ण रेशन मिळायचे. तो आपले अन्न वाचवत असे. मग तो ते अन्न गुपचूप गीताकडे घेऊन जायचा. लेल तिच्या मित्रांसमवेत गीता आणि तिच्याबरोबर राहणाऱ्या कैद्यांना मदत करायचा. ते त्यांचे दागिने घेऊन जवळच्या खेड्यातील लोकांना विकत असत. मग ते त्याऐवजी रेशन आणून ते कैद्यांना देत असत.

लेल आणि गीता वेगळे झाले

हे सुमारे दोन वर्षे चालले. गीता आणि त्यांचे प्रेम वाढतच गेले. 1945 मध्ये आपला पराभव पाहून नाझी सैन्याने ऑशविट्‌स व इतर कॅम्पमधून कैद्यांना हलवायला सुरवात केली. या वेळी गीतालाही ऑशविट्‌सकडूनही नेण्यात आले. लेल आणि त्याचे प्रेम वेगळे झाले होते. लेलला फक्त इतकेच माहीत होते, की त्याच्या प्रेयसीचे नाव गीता फुर्मानोवा होतं. त्याशिवाय त्याला काहीच माहीत नव्हतं. जेव्हा सोव्हिएत सैन्याने नाझी लोकांकडून ऑशविट्‌स कॅम्पला मुक्त केले, तेव्हा लेल घोडागाडी घेऊन त्याच्या चेकोस्लोव्हाकियातील क्रोमपाची या गावी गेला. त्याच्या मनात गीताचा एकच विचार होता. त्याला कसल्याही परिस्थितीत गीताला शोधायचे होते. म्हणूनच तो अनेकांच्या घरोघरी फिरत राहिला. लेलजवळ कैद्यांचे काही दागिने होते, ज्याच्या मदतीने तो घरी पोचला. तेथे त्याला त्याची बहीण गोल्डीही सापडली. योगायोगाने नाझींनी लेलचे घरदेखील वाचवले. आता लेलच्या जीवनाचा एकच उद्देश होता, तो म्हणजे त्याचे प्रेम गीताला शोधणे.

गीताला लेलने कसे शोधले...?

लेल त्याच्या मूळ गावी ब्रॅटिस्लावा शहरातील स्लोव्हाक येथे गेला. कित्येक आठवडे तो ब्रॅटिस्लावाच्या रेल्वे स्टेशनवर दररोज पहाटेपासून संध्याकाळपर्यंत येणाऱ्या गाड्या पाहत असे. त्याला वाटायचे, की येथे गीता नक्की सापडेल. एके दिवशी स्टेशन मास्तरने लेलला रेडक्रॉसच्या कार्यालयात जाण्याचा सल्ला दिला.

तुम्ही शाहरुख खानचा तो डायलॉग ऐकला असेलच ना, "इतनी शिद्दत से मैंने तुम्हें पाने की कोशिश की है... कि हर जर्रे ने मुझे तुमसे मिलाने की साजिश की है'. लेल आणि गीताच्या प्रेमामध्येही तेच सत्य सिद्ध झाले. जेव्हा लेल आपल्या घोडागाडीने रेडक्रॉसच्या ऑफिसकडे ब्रॅटिस्लावा रेल्वे स्थानकावरून जात होता, तेव्हा अचानक एक महिला त्याच्यासमोर आली. ती दुसरी तिसरी कोणी नसून त्याची सोडून गेलेली गीता फुर्मानोवा होती. एकमेकांसाठी धडधडणारे दोन हृदय (मनं) एकत्र आली होती. लेल ज्या गीताला शोधत होता त्याला ती सापडली होती. ऑक्‍टोबर 1945 मध्ये दोघांनी लग्न केले. दोघांनी स्लोव्हाकियातील सोव्हिएत संघाचा कब्जा पाहता त्यांची नावे गीता आणि लेल सोकोलोव्ह अशी बदलली. तेथे त्याने कपड्यांचे दुकान उघडले. त्यानंतर त्यांचे आयुष्य मजेत गेले.

इस्राईलला मदत करण्यावरुन अटक

पण, एक दिवस सरकारने त्याला पकडले. गीता आणि लेल इस्राईलला मदत करण्यासाठी पैसे पाठवत असत. हा देशद्रोह मानून त्याचा व्यवसाय सरकारने काढून घेतला. दोघांनाही तुरुंगात टाकण्यात आले. काही दिवसांनी हे दोघे तुरुंगातून पळून गेले. मग ते व्हिएन्नाला गेले. तेथून त्यांनी पॅरिस गाठले. शेवटी, दोघांनीही युरोपपासून बरेच दूर जाण्याचे ठरविले.

युरोपहून गीता आणि लेल ऑस्ट्रेलियाला आले. येथे त्याने सिडनीमध्ये नव्याने आयुष्य सुरू केले. लेलने पुन्हा कपड्यांचा व्यवसाय सुरू केला, जो बंद झाला होता. गीताने ड्रेस डिझायनिंगचे काम सुरू केले. 1961 मध्ये दोघांना एक मुलगा झाला, ज्याचे नाव लेल आणि गीता यांनी गॅरी असे नाव ठेवले. गीता आणि लेल यांनी उर्वरित आयुष्य मेलबर्न शहरात घालवले. यादरम्यान, गीता अनेक वेळा युरोपमध्ये गेली, परंतु लेल पुन्हा कधीही युरोपमध्ये गेला नाही. त्याला भीती होती की नाझी कॅम्पमध्ये टॅटू बनवण्याबद्दल जगाला माहिती होईल. जगाला हे रहस्य सांगण्यापासून गीताने नेहमीच त्याला रोखले. पण, 2003 मध्ये गीताने या जगाचा निरोप घेतला. आयुष्याच्या शेवटी लेललासुद्धा असे वाटले, की हे रहस्य त्याच्या मनातच ठेवणे योग्य नाही. पण लेलला भीती वाटत होती, की तो नाझी कॅम्पमध्ये कैद्यांच्या हातावर नंबर गोंदवण्याचे करत होता.

अखेर हीदरला त्याच्याबद्दल माहिती मिळाली. कित्येक आठवड्यांपर्यंत हीदर आपला विश्वास जिंकण्यासाठी लेलशी दररोज भेटली. आणि प्रेमाची ही रोचक कथा जगासमोर आली. हीदर म्हणते की, "दि टॅटूइस्ट ऑफ ऑशविट्‌स' या पुस्तकाची कथा फक्त एक प्रेमकथा नाही, तर ही माणूस जेव्हा राक्षस व्हायला लागतो तेव्हाची कहाणी आहे, जी भावी पिढ्यांना माहीत असणे आवश्‍यक आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()