Pune City
Pune CitySakal

स्वच्छ पुणे शहराचे गुपित नेमके काय?

महापालिकेकडून साधी जलवाहिनी टाकताना जेसीबीचा धक्का लागला म्हणून अर्ध्या शहराची वीज गायब होते, इंटरनेट ठप्प होतं
Published on

पुणे म्हणजे फास्ट नेटवर्क, प्रमुख चौकांमध्ये, रस्त्यांवर वायफाय, लाईटचा झगमगाट, रस्त्यावर धावणाऱ्या इ व्हेईकल यामुळे सुपरफास्ट टेक्नॉलॉजीचे शहर अशी ओळख निर्माण होत आहे. जमिनीवर दिसणाऱ्या टोलेजंग इमारती, वेगाने होणारे मेट्रोचे काम यासह इतर होणाऱ्या सुधारणा यामुळे शहराचा चेहरामोहरा बदलून गेला आहे. हे सगळ पुण्यात का होत आहे? कसं होत आहे?, या पायाभूत सुविधांचे जाळे कुठे आहे. महापालिकेकडून साधी जलवाहिनी टाकताना जेसीबीचा धक्का लागला म्हणून अर्ध्या शहराची वीज गायब होते, इंटरनेट ठप्प होतं. पण याचा आणि वीज गायब, इंटरनेट बंद पडण्याचा काय संबंध आहे असाही प्रश्‍न पडतो. पण हा संबंध आहे. जसं लग्न ठरताना म्हणतात ना वधु -वर कोण असणार याच्या रेशीम गाठी स्वर्गातच बांधलेल्या असतात. तसेच या वायरींचा संबंध पुण्याच्या भूगर्भात आहेत. नुसते भूगर्भात आहेत, असे नाही तर, यावर शहराचा अर्थव्यवस्था अवलंबून आहे. त्यामुळे पुण्याच्या पोटात दडलय काय? असा प्रश्‍न पडणे सहाजिक आहे.

Loading content, please wait...