डॉ. दिलीप सातभाई
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२४-२५ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला आहे. मध्यमवर्गीय म्हणजेच पगारदारवर्ग असे लक्षात धरून चार कोटी पगारदारांना प्रमाणित वजावटीत वाढ करून दिलासा दिला आहे, तो स्वागतार्हच आहे.
छोटे व्यावसायिक, बौद्धिक व्यवसाय करणारे व्यावसायिक, छोटे व्यापारी, किरकोळ दुकानदार हेदेखील मध्यमवर्गीयांतच मोडतात.
तथापि, त्यांच्यासाठी फार मोठी तरतूद या अर्थसंकल्पात दिसत नाही. यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पाने सर्वसामान्यांना नक्की काय दिले, यावर टाकलेला प्रकाश.