मोबाईल फोन्स सामान्य माणसाच्या आवाक्यात आले.
माध्यमक्रांतीमुळे माहितीचे मायाजाल जगभर पसरले आहे. मोबाईल फोन्स सामान्य माणसाच्या आवाक्यात आले. तो काळ होता कि-पॅड मोबाईलचा २० वर्षांपूर्वीचा! त्यावर स्नेक नावाचा एक गेम अतिशय लोकप्रिय होता. त्यामध्ये संगीत नव्हते, कलर ग्राफिक नव्हते. लहान मुले, नोकरदार तासनतास तो गेम खेळायचे! थ्रीजी तंत्रज्ञानाने मोबाईल जगतात क्रांतीची सुरवात झाली. आणि आता हळूहळू मोठ्यांपासून ते लहानग्यांच्या आयुष्यात आभासी घोटावरची बेभान नशा बनत चालली आहे. या आभासी जगातील हे गेमचे गुत्ते कायदेशीर आहेत का? कोणत्या गेमन्सना सरकारने परवानगी दिली आहे, हे कोणालाही माहिती नाही. चीन सरकारच्या लक्षात आले आहे की, याचे भविष्यकालीन परिणाम अतिगंभीर आहेत, त्यामुळे त्यांनी मोबाईल कंपन्यांना विशिष्ट वेळेतच गेम चालू ठेवण्याची परवानगी दिली आहे. मग चीन करू शकतो, मग आपण का नाही?