सुवर्णा बेडेकर:-
लोकशाहीचे मर्म असलेला लोकसभा निवडणुकीचा उत्सव सध्या सुरू आहे. प्रत्येक निवडणूक वैशिष्ट्यपूर्ण असते, तशीच हीसुद्धा आहेच. विविध पक्षांच्या नेत्यांमध्ये होणारी फाटाफूट असो अथवा प्रचाराचा गदारोळ... सर्वसामान्य माणूस, विशेषतः गुंतवणूकदार या सर्व घटना-घडामोडींकडे अतिशय बारकाईने लक्ष देत असतो. हा सामान्यातला असामान्य मतदार राजा कसा कौल देणार, याची उत्सुकता आहेच.
दुसरीकडे गुंतवणूकदार वर्ग आपली समीकरणे मांडताना अनेक अपेक्षाही बाळगून आहेत. अर्थव्यवस्था हे चक्र आहे, ते फिरतं राहिलं पाहिजे. यासाठी गुंतवणुकीचा विचार करताना सरकारची धोरणं मुक्त असली तरी गुंतवणूकदारांनी भयमुक्त आणि क्षणिक लोभमुक्त बनून दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक केली पाहिजे, यामध्ये सर्वांचं हित आहे. याविषयी काही आर्थिक पाहण्यांच्या आधारे काढलेला हा गोषवारा!