डॉ. किरण जाधव,
kiran@kiranjadhav.com
या लेखाची कल्पना भारताची पुढील पाच वर्षे आणि त्यापुढील शेअर बाजाराचा कल समजून घेणे यावर आधारित आहे.
तांत्रिकदृष्ट्या अशा दीर्घकालीन भविष्यवाणीसाठी ‘इलियट वेव्ह थिअरी’ नावाचा एक सिद्धांत आहे, ज्यात आधुनिक बाजार परिस्थितीनुसार बदल करून आगामी परिस्थितीबद्दलचे काही अंदाज वर्तविले आहेत.
सध्याचे ‘बुल मार्केट’ २०२० मध्ये सुरू झालेले आहे, जिथे ‘सेन्सेक्स’ २५,००० अंशांवर होता. आता सातपट वाढ झाली, तर ‘सेन्सेक्स’ १,७५,००० अंशांचे उद्दिष्ट गाठताना दिसेल.