मुंबई : तिकडे खेळायला नको जाऊ डास चावतील, हे खाऊ नकोस ते तेलकट आहे, थांब ड्रेस भरेल मी भरविते तुला, हे नको खेळू तुला लागेल त्यापेक्षा हा गेम खेळ, असं नको खेळू तसं खेळ.. तुमच्या मुलांना तुम्ही सारखं असं नियंत्रित करता का? पण असं करणं हे हेलिकॉप्टर पॅरेंटिंगचं लक्षण आहे हे तुम्हाला माहिती आहे का?
आता तुम्ही म्हणाल, 'हेलिकॉप्टर पॅरेन्ट' हा काय प्रकार आहे? अगदी व्याख्याच सांगायची झाली तर ''असे पालक जे आपल्या पाल्यांच्या आयुष्यात खूप जास्त लक्ष घातलात आणि त्यांना खूप जास्त प्रमाणात नियंत्रित करतात (विशेषतः त्यांच्या शिक्षणाच्या संदर्भात) त्यांना हेलिकॉप्टर पॅरेन्ट म्हंटले जाते."