दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण आणि लक्ष्मी येण्याचाही. मात्र यंदाच्या दिवाळीदरम्यान गाजणारी एक गोष्ट आहे, घोटाळ्याची. आर्थिक घोटाळ्याची. हायबॉक्स घोटाळ्याची.
असं म्हटलं जातंय की भारतातल्या या हायबॉक्स ॲप्लिकेशन घोटाळ्यामुळे आपण भारतीयांनी तब्बल १,००० कोटी रुपयांचा तोटा सहन केलाय.
यूट्युबर एल्विश यादव, कॉमेडियन भारती आणि हर्ष लिंबाचिया यांच्यासह अनेक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स या घोटाळ्यात अडकले असल्याची शक्यता आहे.
एका मोबाइल ॲप्लिकेशनने अनेकांचा खिसा रिकामा करण्यासारखं नेमकं झालंय तरी काय? जाणून घेऊया, सकाळ प्लसच्या या लेखामधून.