What is Mpox & what are the symptoms? Global Health Emergency: जागतिक आरोग्य संघटनेने मंकी पॉक्स या आजाराच्या साथीकडे गांभीर्याने बघत आरोग्यविषयक आणीबाणी जाहीर केली. काँगो प्रजासत्ताकात पहिल्यांदा आढळलेल्या या आजारामुळे सगळ्या जगाला धडकी भरवण्याचं कारण काय?
जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) काँगो आणि आफ्रिकेतील इतर ठिकाणी सुरुवात झालेल्या एमपॉक्सच्या (मंकीपॉक्स) साथीला जागतिक आरोग्य आणीबाणी म्हणून घोषीत केलं आहे.
जगातल्या तबब्ल ११६ देशांतल्या नागरिकांना विशेषत: लहान मुलांना त्याची लागण झाल्याची भीती आहे.