प्रमोद पुराणिक
मुंबई शेअर बाजाराचा टेलिकम्युनिकेशन (टेलिकॉम) निर्देशांकावर लेख प्रसिद्ध करीत आहोत. गेल्या ३० ऑगस्ट २०२४ रोजी हा निर्देशांक ३३२० अंशांवर बंद झाला. या निर्देशांकाने ७१.४ टक्के वार्षिक वाढ दाखविली.
मात्र, या निर्देशांकात असलेल्या शेअरचा समावेश, त्यांचे बाजारमूल्यांकन, उपलब्ध मूल्यांकन; तसेच निर्देशांकाचा पीई रेशो उणे २८.६ आहे. या निर्देशांकात ज्या कंपन्यांचा समावेश केलेला आहे, अशा एकूण १७ कंपन्या आहेत.
परंतु, भारती एअरटेल, आयडिया व्होडाफोन अशा निवडक कंपन्यांचे बाजार मूल्यांकन चांगले आहे आणि उपलब्ध मूल्यांकनसुद्धा विचारात घेण्यासारखे आहे. मात्र, इतर कंपन्यांच्याबाबत सगळा आनंदी-आनंदच आहे.