डॉ. संतोष पुरी:
कर्करोगाचा आजार असलेल्या व्यक्तीवर वेगवेगळ्या प्रकारचा परिणाम होत असतो. यामुळे मानसिकदृष्ट्या चिंता, नैराश्य आणि भावनिकदृष्ट्या विविध अडचणी येऊ शकतात. या आजाराचा शारीरिक, मानसिक आणि आर्थिक आरोग्यावर आधीच परिणाम होत असताना, याचे आर्थिक ओझे पडू नये म्हणून काम करणारा सर्वसमावेशक आरोग्य विमा ही काळाची गरज आहे. कर्करोगाच्या काळजीसाठी सर्वसमावेशक कव्हरेज हे या रोगाशी संबंधित सर्व चिंता दूर करेल. कर्करोगाच्या खर्चापासून संपूर्ण संरक्षणासाठी आरोग्य विमा योजना कशा वापरल्या जाऊ शकतात, ते समजून घेऊ या.