कौस्तुभ केळकर:-
आपल्या देशात गेल्या काही काळापासून डिजिटल पेमेंट व्यवस्था मोठ्या प्रमाणात वापरली जात आहे. ज्येष्ठ नागरिकही त्याचा वापर करत आहेत. त्याचवेळी आर्थिक प्रगतीमुळे आर्थिक उलाढालीही वाढल्या आहेत. त्यामुळे व्यवहारांमधील अडचणी, समस्या; तसेच आर्थिक फसवणुकीच्या घटनाही वाढल्या आहेत. आर्थिक व्यवहारांमध्ये अडचणी येणाऱ्या किंवा फसवणूक झालेल्या लोकांना आपल्या समस्येचे तत्काळ निराकरण व्हावे, अशी अपेक्षा असते. मात्र, याकरिता योग्य मार्गाची (चॅनेलच) निवड करणेही महत्त्वाचे असते.