मुंबई : देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून काही राज्य ही काँग्रेसचा बालेकिल्ला होती. त्यातलाच एक महाराष्ट्र. ६० वर्ष म्हणजे १९९५ पर्यंत महाराष्ट्र राज्य हे काँग्रेसचा प्रभाव असणारे राज्य होते. यामध्ये मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र या भागात कायमच काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. मात्र गेल्या काही वर्षात हे बालेकिल्ले जाण्यामागे फक्त भाजपची जाहिरातबाजीच कारणीभूत ठरली की काँग्रेसचे नियोजन देखील कमी पडले?
विधानसभा २०२४ चे निकाल जसजसे समोर येऊ लागलेत त्यात काँग्रेसचा 'हक्काचा मतदार' ज्या भागात आहे अशा भागातही काँग्रेसचा दारुण पराभव झालेला पहायला मिळत आहे. मराठवाडा मध्ये ४६ तर विदर्भात ६२ जागांवर झालेल्या मतदानात भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आघाडी घेतली आहे. खरं तर महाराष्ट्रातील हे प्रदेश काँग्रेसचे बालेकिल्ले मानले जावे असे चित्र काही वर्षांपासून येथे पाहायला मिळत होते. मात्र हे हक्काचे गड देखील काँग्रेसला राखता आले नाहीत.